Headlines

ज्येष्ठ नागरिक समाजासाठी दीपस्तंभासारखे दिशादर्शक:रायपूरमध्ये प्रा. टी. पी. निकम यांचे प्रतिपादन‎




ज्ञान, संस्कार, संस्कृती आणि नीतिमूल्ये जपणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमुळे आदर्श समाज घडतो. समाजासाठी ज्येष्ठ नागरिक दीपस्तंभासारखे दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. टी. पी. निकम यांनी केले. रायपूर येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘प्रसदगिरी ज्येष्ठ नागरिक संघा’ची उत्साहात स्थापना करण्यात आली. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभाकर पानपाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्हा उपाध्यक्ष प्रा. टी. पी. निकम, आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक समाधान थोरात, चांदवड तालुका उपाध्यक्ष शंकरराव निखाडे, सचिव गोपीनाथ खैरे उपस्थित होते. सभेत प्रसदगिरी ज्येष्ठ नागरिक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष निवृत्ती गुंजाळ, उपाध्यक्ष रामकृष्ण गुंजाळ, सचिव प्रभाकर पानपाटील यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांची निवड करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. टी. पी. निकम यांनी ज्येष्ठांच्या मालमत्ता व संरक्षणासंबंधी कायदे, कायदेशीर हक्क तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजना व सवलतींची सविस्तर माहिती दिली. आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक समाधान थोरात यांनी ज्येष्ठांसाठीच्या विशेष योजना, कर्ज, ठेवी आणि सवलतींबाबत माहिती देत आर्थिकदृष्ट्या सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *