Headlines

नांदगाव पेठ परिसरातील पशूंवर‎आठवड्यातून तीनच दिवस उपचार‎:डॉ. हटकर यांची बदली रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी




नांदगाव पेठ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देवराव हटकर यांची नुकतीच अचलपूर येथे पशुवैद्यकीय रुग्णालयात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. हटकर आठवड्यातील तीन दिवस अचलपूर येथे सेवा देत असून, उर्वरित केवळ तीन दिवस ते नांदगाव पेठ येथे सेवा देत आहेत. मात्र तीन दिवस परिसरात असलेल्या अनेक गावांमधील शेतकरी व पशुपालक पशुधनाच्या उपचारासाठी पुरेसे नाहीत. या पशुवैद्यकीय दवाखान्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. या ठिकाणी अन्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यापेक्षा डॉ. हटकर यांचीच पूर्णवेळ नियुक्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह पशुपालकांनी जिल्हाधिकाऱ्यांनकडे केली आहे. डॉ. हटकर यांच्या कार्यकाळात पशुधनावरील विविध आजारांवर उपचार करण्यासोबतच पशुवैद्यकीय शस्त्रक्रिया, रोगप्रतिबंधक लसीकरण, कृत्रिम रेतन तसेच विविध शासकीय पशुसंवर्धन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आल्याचे पशुपालकांनी सांगितले. विशेष म्हणजे, अनेक गुंतागुंतीच्या पशुशस्त्रक्रिया यशस्वीपणे करून अनेक मुक्या प्राण्यांचे त्यांनी प्राण वाचवले आहेत. त्यामुळे त्यांच्या उपचारपद्धतीवर पशुपालकांचा विश्वास निर्माण झाला असून, आपातकालिन परिस्थितीतही त्याच्याकडून मिळणाऱ्या सेवेमुळे अनेक पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पशुधन हे ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. अशा परिस्थितीत अनुभवी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची बदली झाल्यास पशुधनाच्या उपचारासाठी दूरवर जावे लागू शकते. आपातकालिन परिस्थितीत पशुवैद्यकीय सेवा मिळण्यास विलंब झाल्यास पशुधनाच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता पशुपालकांनी व्यक्त केली आहे. पशुवैद्यकीय दवाखाने, पशुधनाच्या समस्यांकडे लक्ष नाही ः पशू वैद्यकिय दवाखान्यावर नांदगाव पेठसह आजूबाजूच्या १० ते १२ गावांतील पशूपालक अवलंबून आहेत. परिसरात दुधाळ जनावरांची संख्या मोठी असताना पशुवैद्यकीय सेवा मात्र आठवड्यातील निम्मे दिवस उपलब्ध असल्याने पशुपालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दवाखानाच नियमित सुरू राहत नसल्याने पशुवैद्यकीय सेवेचा उद्देशच बाधित होत असल्याची भावना पशुपालकांमध्ये आहे. नांदगाव पेठ येथिल राज्यस्थरिय पशुवैद्यकीय दवाखाना पशुवैद्यकीय सेवा नियमित करण्याची खरी अवश्यकता ‘अ’ दर्जाचा पशुदवाखाना असतानाही आठवड्यात तीनच दिवस सेवा मिळणे अन्यायकारक आहे. कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी, औषधे, लसी व आवश्यक साधने उपलब्ध करून द्यावीत. अन्यथा याविरोधात आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. – नितीन हटवार, शिवसेना नेते. माझ्या पश्चात दोन कर्मचारी आजारी पशुंवर उपचार करतात अचलपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात माझी बदली करण्यात आली असून, तूर्तास आठवड्यातून तीन दिवस अचलपूर व तीन दिवस नांदगाव पेठ येथे माझी पशुवैद्यकीय सेवा सुरू आहे. माझ्या पश्चात तीन दिवस नांदगाव पेठ येथे दोन कर्मचारी तैनात आहेत. मी नसतांना देखील ते प्राथमिक जबाबदारी पार पाडत आहेत. डॉ. देवराव हटकर, पशुवैद्यकीय अधिकारी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *