Headlines

नेपाळमधील पर्यटकांच्या रेस्क्यूसाठी राज्य सरकार अलर्टवर, केंद्राशी समन्वय:ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदत – देवेंद्र फडणवीस




नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण महापुराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कैलास मानसरोवर यात्रेसह विविध कारणांसाठी नेपाळ आणि तिबेटमध्ये गेलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्णपणे ‘अलर्ट मोड’वर असून, पर्यटकांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी MPSC परीक्षा, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि मुंबईतील टॅक्सी चालकांच्या मुद्द्यावरही सरकारची भूमिका स्पष्ट केली. नेपाळमधील पर्यटकांसाठी ‘रेस्क्यू प्लॅन’ नेपाळमधील महापुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांप्रती फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “मानसरोवर यात्रा आणि इतर कारणांसाठी महाराष्ट्रातील काही पर्यटक तिबेट आणि नेपाळमध्ये गेले आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. महाराष्ट्रातून गेलेल्या सुमारे ८० पर्यटकांची माहिती सरकारकडे आली असून, त्यापैकी आतापर्यंत ४ जणांशी संपर्क झाला आहे. नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकारसोबत आमची चर्चा सुरू असून, रेस्क्यू ऑपरेशनची पूर्ण तयारी सरकारने ठेवली आहे.” अद्याप अडकलेल्यांचा अचूक आकडा हाती आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. MPSC मध्ये सुधारणांसाठी समितीची स्थापना नुकत्याच रद्द झालेल्या MPSC परीक्षेबाबत बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले की, शासनाला या परीक्षा १०० टक्के पारदर्शकच हव्या आहेत. “या परीक्षेत ‘मास पेपर फुटी’ झालेली नाही. तो पेपर पर्टिक्युलर एकाच व्यक्तीकडे गेला होता. तरीही पारदर्शकतेसाठी MPSC ने संपूर्ण परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आणि महत्त्वाचा आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत आणि परीक्षेत आमूलाग्र सुधारणा व्हाव्यात, यासाठी सरकारने एक विशेष समिती स्थापन केली आहे, असे फडणवीस म्हणाले. तसेच, पेपर फुटी प्रकरणात अडकलेला नवनाथ बन हा कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, हे फोटोंसह समोर आले असल्याचे सांगत, यावर काहींनी केवळ राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा टोला त्यांनी लगावला. दोषी व्यक्ती कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मराठा समाजासाठी महायुतीचे सर्वाधिक निर्णय मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम असल्याच्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, “त्यांच्या मागण्यांवर सरकारने योग्य ती कारवाई केली असून, सरकारचे प्रतिनिधी त्यांच्या संपर्कात आहेत. महायुती सरकारने मराठा समाजासाठी जितके निर्णय घेतले आणि काम केले, तेवढे यापूर्वी कधीही झालेले नाही. भविष्यात समाजाच्या हितासाठी आणखी काही निर्णय घेण्याची गरज पडल्यास तेही घेण्याची सरकारची तयारी आहे.” ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी १ वर्षाची मुदत मुंबईत परवानाधारक ऑटो आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी भाषा येणे सक्तीचे करण्याबाबतचा मुद्दा चर्चेत होता. यावर तोडगा काढत राज्य सरकारने चालकांना १ वर्षाची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात माहिती देताना फडणवीस म्हणाले, “आज मुंबईतील ऑटो-टॅक्सी चालक संघटनेच्या प्रतिनिधींनी माझी भेट घेतली. महाराष्ट्रात जुजबी मराठी आलेच पाहिजे, या भूमिकेला त्यांचेही पूर्ण समर्थन आहे. मात्र, भाषा शिकण्यासाठी त्यांनी शासनाकडे १ वर्षाचा वेळ मागितला होता. त्यांच्या मागणीचा विचार करून राज्य सरकारने त्यांना १ वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.” हेही वाचा.. नेपाळमध्ये 289 मृतदेह सापडले:1500 जणांचा शोध, 288 भारतीय बेपत्ता; वाचवलेल्या 21 भारतीयांपैकी 11 ची ओळख पटली बुधवारी सकाळी नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या अचानक आलेल्या पुराच्या तडाख्यानंतर आतापर्यंत २८९ मृतदेह सापडले आहेत. सुमारे १,५०० लोक अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये नेपाळी नागरिकांसोबतच मोठ्या संख्येने परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. नेपाळमध्ये लष्कर, पोलीस आणि सशस्त्र पोलीस पथके बेपत्ता झालेल्यांचा सतत शोध घेत आहेत. पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टर आणि इतर साधनांच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *