![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथे ‘पुणे ऑन पेडल्स’ सायकल रॅली आणि ‘पुणे वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने 13 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 6 वाजता हा उपक्रम सुरू होईल. आरोग्य आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्त्व समाजात रुजवणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, सायकल वापरास प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून आयोजित केला जात आहे. पुणे शहराची ओळख ‘सायकलचे शहर’ अशी आहे आणि सायकल वापरणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. यंदाच्या सायकल रॅलीत सहा हजारांहून अधिक सायकलस्वार सहभागी होण्याची अपेक्षा आहे. त्या पुढे म्हणाल्या, “ही रॅली केवळ सायकल चालविण्याचा कार्यक्रम नसून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यजागृतीचा संदेश देणारा उपक्रम आहे. नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या चळवळीला बळ द्यावे.” यावेळी काही गरजू मुलामुलींना सायकलचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. रॅलीत सहभागी प्रत्येक व्यक्तीला पदक, प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देऊन गौरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. सायकल रॅलीचा प्रारंभ आणि सांगता बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे होईल. रॅलीचा मार्ग कर्वे रोड – गुडलक चौक मार्गे वळून डेक्कन जिमखाना बस स्टॉप, छत्रपती संभाजी महाराज पुतळा, खंडोजी बाबा चौक, सावरकर स्मारक मार्गे कर्वेरोडवरून परत बाल शिक्षण मंदिर येथे येईल. फॅमिली वॉकेथॉन/चालणे (वॉकिंग/रनिंग) याचा प्रारंभ आणि सांगता देखील बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे येथेच होईल. वॉकेथॉनचा मार्ग कर्वे रोड – नळ स्टॉप वळण घेऊन कर्वे रोड मार्गे परत बाल शिक्षण मंदिर येथे येईल.
Source link
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सायकल रॅली:6 हजारांहून अधिक सायकलस्वार सहभागी होण्याची अपेक्षा