Headlines

संभाजीनगरातील सामान्यांचे जीवनमानसुधारा, उद्योग आपोआप येतील:पंतप्रधानांचे मोदींचे आर्थिक सल्लागार संन्याल यांचा सत्ताधारी, प्रशासनाला सल्ला



शहरात नवीन उद्योग आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करायची असेल, तर केवळ पायाभूत सुविधा किंवा जमिनीची उपलब्धता पुरेशी नाही. शहरात राहणाऱ्या सामान्य लोकांचे जीवनमान गुणवत्ता (क्वालिटी ऑफ लाइफ) आणि नागरी सुशासन उंचावणे अधिक महत्त्वाचे आहे. तुम्ही शहर राहण्या

.

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (सीएमआयए) आणि सीएसएन फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील ईझ ऑफ डूइंग बिझनेससाठी प्रक्रियात्मक सुधारणा आणि छत्रपती संभाजीनगरचे भविष्य या विषयावर संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी महापौर समीर राजूरकर, इमाव मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, अनुराधा चव्हाण, महापालिका आयुक्त अमोल येडगे तसेच डॉ. भागवत कराड, सीएमआयएचे अथर्वेशराज नंदावत, अजिंक्य सावे, मिहीर सौंदलगेकर तसेच रितेश मिश्रा आदींची उपस्थिती होती.

भारतात व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी प्रक्रियात्मक सुधारणा या विषयावर संन्याल यांनी उद्योगजगत, प्रशासकीय अधिकारी आणि शहरातील नागरिकांशी संवाद साधला. उद्योगांच्या विकासासाठी आणि रोजच्या प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी नियम व कायदे सुटसुटीत असणे आवश्यक असल्याचे सांगत, संन्याल यांनी प्रक्रियात्मक सुधारणांचा आग्रह धरला.

दर्जेदार पायाभूत सुविधाच नाहीत हे लक्षात आले

छत्रपती संभाजीनगरची अवस्था चाकणप्रमाणे बिकट होऊ नये, यासाठी उद्योग संघटना प्रयत्न करत आहेत. संन्याल यांनी भाषणामध्ये शहराचा तसेच संघटनांनी दिलेल्या प्रेझेंटेशनवरही संन्याल यांनी फारसा उल्लेख केला नाही. मात्र, संभाजीनगरात दर्जेदार पायाभूत सुविधाच नसल्याचे लक्षात आल्यामुळे प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये त्यांनी शहराचा उल्लेख करत शाश्वत विकासाचा मंत्र दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *