Headlines

जिममध्ये व्यायाम करतानाच तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू:कन्नड शहरातील घटना, मृत अंकुश रावते बहिरगावचे रहिवासी‎




जिममध्ये दैनंदिन व्यायाम करत असताना बहिरगाव (ता. कन्नड) येथील रहिवासी अंकुश कडुबा रावते (३०) या तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे कन्नड शहर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश रावते हे नेहमीप्रमाणे गुरुवारी (२७ ऑगस्ट) सकाळी आपल्या पुतणीला शाळेत सोडल्यानंतर कन्नड शहरातील एका खाजगी जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेले होते. व्यायाम करत असताना अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना झाल्या आणि ते जिममध्येच कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अंकुश रावते हे पाणपोई फाटा ते बहिरगाव रस्त्यालगत असलेल्या बळीराजा नर्सरीचे मालक होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली आणि दोन भाऊ असा परिवार आहे. व्यायाम क्षमतेनुसारच करावा जिममध्ये प्रत्येकाने शरीराला जेवढा झेपेल तेवढाच व्यायाम करावा. जिमचालकांनी उमेदवाराची फिटनेस तपासणी करून व फिजिशियनच्या अहवालानुसारच व्यायामास परवानगी देणे गरजेचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत जलद वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठी शहरातील सर्व जिमचालकांनी नगरपालिकेकडे अधिकृत नोंदणी करणे आवश्यक आहे. -डॉ. सदाशिव पाटील, कन्नड



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *