Headlines

श्रावणामध्ये मटण मागितल्याने वडिलांनी मुलाला संपवले:पुण्यात आई-वडील अटकेत, मृताची पत्नी आणि 2 मुले माहेरी




श्रावण महिन्यात मटणाचे जेवण बनवण्याची मागणी केल्यामुळे वडील आणि मुलामध्ये झालेल्या वादाला हिंसक वळण मिळाले. वडिलांनी केलेल्या मारहाणीत ३० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात घडली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी मृत तरुणाच्या आई-वडिलांना अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव महेश भागवत गायकवाड असे आहे. पोलिसांनी त्याचे वडील भागवत सूर्यभान गायकवाड (६४) आणि आई पार्वती भागवत गायकवाड (६०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. वडिलांवर मुलाला मारहाण करून त्याचा जीव घेतल्याचा, तर आईवर पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे सांगण्यात आले. मद्यपान करून आल्यानंतर वाद घटनेच्या रात्री महेश मद्यपान करून आई-वडिलांच्या घरी आला. त्याने मटणाचे कालवण बनवण्याची मागणी केली. श्रावण महिना सुरू असल्याने घरामध्ये मांसाहार बनवला जाणार नसल्याचे कुटुंबीयांनी त्याला सांगितले. मात्र, महेशने आग्रह कायम ठेवल्याने वडील आणि मुलामध्ये जोरदार वाद झाला. वादादरम्यान वडिलांनी महेशच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *