Headlines

अभय ठरला ‘मिस्टर विदर्भ’चा मानकरी:‘विदर्भ फेस ऑफ द इयर’ स्पर्धेत कामगिरी, कौतुकाचा वर्षाव‎




‘मिस्टर विदर्भ’ किताबावर नाव कोरत शहरातील प्रकाश आंबेडकर नगर येथील अभय नितीन शेगोकार यांनी अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. अमरावती येथे झालेल्या ‘विदर्भ फेस ऑफ द इयर’ स्पर्धेत विविध स्पर्धकांना मागे टाकत अभय यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची आणि आत्मविश्वासाची छाप उमटवली. त्यांच्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. बीएसएफ बहुउद्देशीय संस्था, अमरावती, सत् कबीर बहुउद्देशीय संस्था, बुलडाणा आणि पीबी फिल्म प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने जाधव पॅलेस, अमरावती येथे ‘विदर्भ फेस ऑफ द इयर’ व ‘कर्तृत्व भूषण’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी नाशिकच्या समाजसेविका वैशाली सोनवणे होत्या. तसेच डॉ. गणेश व्यवहारे, मॉडेल प्रविणा दाढे, डॉ. चारुशीला लोखंडे, कनिका तेहलयानी, सागर भुरे, शीतल बावणे, अनिता सूर्यवंशी, मनीषा पांडे, अश्विनी सांगळे, अश्विनी पुरी, मीनाक्षी सोनवणे, मंदाताई सूर्यवंशी, रामभाऊ गवई, आदित्य वानखडे व अभिनेता स्वप्नील जयस्वाल यांच्या उपस्थितीत अभय शेगोकार यांचा ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन अश्विनी सांगळे व अतुल चव्हाण यांनी केले. या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी भूषण सरदार व आर्यमेघ सरदार यांनी परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *