Headlines

एकाच कामाला दोन योजनांचा ‘मुलामा’; खामगावातील विकास कामांवर आरोप:तांडा-दलित वस्ती सुधार योजनेतील कामांची चौकशी करण्याची मागणी‎



तालुक्यातील खामगाव येथे तांडा वस्ती सुधार योजना आणि दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण बडधे यांनी केला आहे. या दोन्ही योजनांमधून मंजूर कामांची तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर

.

तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम मंजूर झाले होते. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप बडधे यांनी केला आहे. तसेच मंजूर रस्ता एकाच ठिकाणी पूर्ण न करता त्याचे वेगवेगळे भाग करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मंजूर रस्त्यापैकी काही भाग रांजणे वस्ती येथे, तर उर्वरित काम इतरत्र करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. याशिवाय, तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर झालेल्या ठिकाणीच दलित वस्ती सुधार योजनेंतर्गतही काम मंजूर करून कामांची पुनरावृत्ती करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे शासन निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

मंजूर कामांची प्रत्यक्ष पाहणी करून अंदाजपत्रक, प्रशासकीय मंजुरी, निश्चित जागा आणि प्रत्यक्ष कामाची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात ग्रामविकास अधिकारी रावसाहेब डवले तसेच पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कामांची देयके अदा करू नयेत. अनियमितता आढळल्यास दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बडधे यांनी दिला आहे.

हे आहेत आरोप व मागण्या • तांडा वस्तीतील रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याचा आरोप • मंजूर रस्त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी काम केल्याचा दावा • तांडा व दलित वस्ती योजनेतील कामांची पुनरावृत्ती झाल्याचा आरोप • मंजूर कामांची प्रत्यक्ष पाहणी व तांत्रिक तपासणीची मागणी • चौकशी होईपर्यंत देयके थांबविण्याची मागणी • दोषी आढळल्यास कारवाई; अन्यथा आंदोलनाचा इशारा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *