Headlines

डोंगरकडात जुन्या वादातून कुटुंबावर प्राणघातक हल्ला:4 जणांविरुद्ध आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल




कळमनुरी तालुक्यातील तालुक्यातील डोंगरकडा फाटा येथे गाडीची काच फोडल्याच्या कारणावरून तसेच जुन्या वादातून एकाच कुटुंबातील तीन सदस्यांवर लोखंडी रॉड, टॉमी, वीट आणि काठीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये तिघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुरुवारी ता. 27 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरकडा फाटा येथील शेख गफार शेख महबूब यांच्या घरासमोर आजम पठाण, सलीम पठाण, ईकबाल पठाण, अत्ताउल्ला पठाण (सर्व रा. डोंगरकडा फाटा) यांनी संगनमत करून एकत्र येऊन शेख गफार यांच्या मुलाच्या दुचाकी वाहनाची काच फोडली. यावरून शेख गफार यांनी जाब विचारला असता चौघांनी त्यांच्याशी वाद करून शिवीगाळ केली. सकाळी मुलांशी भांडण का केले अशी विचारणा केली. शाब्दीक चकमकीनंतर वाद वाढत गेल्याने चौघांनी शेख गफार यांना मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीत शेख गफार यांच्यावर हल्ला चढविला.यामध्ये लोखंडी रॉड व वीटांनी मारहाण केली. यामुळे घाबरलेल्या शेख गफार यांनी मदतीसाठी आरडा ओरड केल्यानंतर त्यांचा मुलगा शेख समीर व शेख शाहरुख भांडण सोडण्यासाठी आले असतांनाही त्यांनाही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या मारहाणीत जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी शेख गफार यांनी गुरुवारी ता. 27 आखाडा बाळापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी वरील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शरद मरे, जमादार संतोष नागरगोजे पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *