Headlines

प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न:प्रियकराचा‎ बुडून मृत्यू, तर मुलगी बचावली‎, अकोल्याच्या पारधीवाडा भागातील घटना




तालुक्यातील कुरुम येथील पारधीवाडा परिसरात गुरुवारी प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे तरुणीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले; मात्र पाण्यात बुडाल्याने प्रियकर शरद चव्हाण याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात काही काळ तणाव आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, कुरुम येथील शरद चव्हाण याचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. गुरुवारी दोघांनीही गावाजवळील विहिरीत उडी घेतली. हा प्रकार निदर्शनास येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे तरुणीचा जीव वाचला, परंतु शरद चव्हाण याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलिसांकडून तपास सुरू घटनेची माहिती मिळताच माना पोलिस ठाण्याचे ठाणेदार गणेश नावकार सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे, ग्रामीण ठाणेदार महाडिक, शहर ठाणेदार धर्मेंद्र जोशी आणि बोरगाव मंजूचे ठाणेदार वानखडे यांनी मोठा पोलिस ताफा घटनास्थळी तैनात केला. ईदनिमित्त बंदोबस्तावर असलेल्या होमगार्ड्सनी गर्दी पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. खबरदारीचा उपाय म्हणून अकोल्याहून राज्य राखीव पोलिस दलाची (एसआरपीएफ) तुकडी पाचारण करण्यात आली होती. शरद चव्हाण याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून, माना पोलिस पुढील तपास करत आहेत. मोताळा‎मध्ये अल्पवयीनचा विनयभंग;‎युवकाविरुद्ध गुन्हा नोंद दुसरीकडे अल्पवयीनचा वाईट उद्देशाने हात‎पकडून विनयभंग केल्याची घटना‎ 27 ऑगस्ट रोजी सकाळी घडली.‎याप्रकरणी फिर्यादीवरून‎ बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल ‎करण्यात आला आहे. 27 ऑगस्ट‎ रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या ‎सुमारास फिर्यादी आयटीआय‎ कॉलेजला जात असतांना तळणी‎ येथील ज्ञानेश्वर संजय तायडे या‎ 21 वर्षीय युवकाने दुचाकीने ‎फिर्यादीचा पाठलाग केला अन् ‎दुचाकीने फिर्यादीच्या समोर येऊन‎ आपण दोघे पळून जाऊन लग्न‎ करू असे म्हणत फिर्यादीचा‎ वाईट उद्देशाने हात पकडून‎ बळजबरीने दुचाकीवर बसवले ‎आणी नळगंगा धरणावर घेऊन ‎गेला त्याठिकाणी वाईट उद्देशाने ‎ओढले होते. या प्रकरणी मुलीने‎ सुटका करून घेतली. यामुळे ‎युवकाविरुद्ध तक्रार केली.

हे ही वृत्त वाचा साखरेच्या दरवाढीमागे साठेबाजीचा संशय:चौकशीची गरज, पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफांचा मोठा दावा, शक्तिपीठ महामार्गावरही स्पष्ट भूमिका
साखरेच्या दरात अचानक झालेली वाढ आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांत दर पुन्हा खाली आल्याच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या साठ्याची चौकशी करण्याची गरज असल्याचे मत राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. साखर कारखान्यांकडून दाखवला जाणारा साठा आणि प्रत्यक्षात उपलब्ध असलेला साठा यामध्ये तफावत आहे का, याची तपासणी झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. बाजारात मोठ्या प्रमाणावर साखर विक्रीसाठी उपलब्ध करून देताना केंद्र सरकारकडून नियंत्रण ठेवले गेले नाही, त्यामुळे साठेबाजीची शक्यता निर्माण झाली असावी आणि त्यातून दरवाढ झाल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. पत्रकारांशी संवाद साधताना हसन मुश्रीफ यांनी साखरेचे दर, ऊस उत्पादन, पावसातील खंड, शक्तिपीठ महामार्ग, लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिला, रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठीची मुदतवाढ, एमपीएससी पेपरफुटी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *