Headlines

ॲड. रियाज पठाण खून प्रकरण:सात आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप, पुरावे न मिळवता‎ आल्याने पाच निर्दोष‎




नेवासे येथील ॲड. रियाज पठाण खून खटल्यात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी निकाल देत सात आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर पुराव्याअभावी ५ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. १६ सप्टेंबर २०१३ रोजी नेवासे तहसीलच्या आवारात ॲड. पठाण यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. १३ वर्षानंतर या खटल्याचा निकाल आला. खटल्यात सरकार पक्षातर्फे बाजू मांडणाऱ्या विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही माहिती दिली. सन २०१२ मध्ये औरंगाबाद न्यायालयातील अण्णा लष्करे खून प्रकरणात ॲड. पठाण यांनी साक्ष दिली होती. यात त्यांना फितूर घोषित केले होते. मात्र, वृत्तपत्रातील बातमी वाचून ॲड. पठाण हे फिर्यादीच्या बाजूने बोलले, असा अण्णा लष्करे गँगचा असा गैरसमज झाला. याच रागातून पुण्यातील तुरुंगात असलेल्या सोपान गाढे व त्याच्या साथीदारांनी पठाण यांच्या हत्येचा कट रचला. १६ सप्टेंबर २०१३ रोजी दुपारी नेवासे तहसील आवारात ॲड. पठाण यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. जन्मठेप झालेले आरोपी : प्रवीण पोपट खरचंद, मोहन सुरेश लष्करे (फरार), रामेश्वर भगवान गाढे, चौरंगीनाथ गोरक्षनाथ लष्करे, पवन सोमनाथ नरुल्ला, सचिन चंदू चव्हाण, सादिक बशीर शेख. निर्दोष सुटका झालेले : अशोक जालिंदर जगताप, सत्यवान धनराज सोनकांबळे उर्फ लष्करे, विलास पोपट जिरे, सोपान भगवान गाढे, सुनील मोहन परदेशी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *