Headlines

ओबीसींना मोठा झटका:1 सप्टेंबरच्या आंदोलनाला परवानगी नाकारली, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय




ओबीसी समाजाच्या वतीने १ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात प्रस्तावित करण्यात आलेल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आंदोलनासाठी मल्लिकार्जुन पुजारी यांच्या नावाने पोलिसांकडे अर्ज करण्यात आला होता. मात्र, आझाद मैदान पोलिसांनी विविध कारणे नमूद करत आंदोलनास परवानगी देण्यास नकार दिला आहे. रुग्णालये आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास आझाद मैदान परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच परिसरातील रुग्णालयांच्या कामकाजावर आणि आपत्कालीन सेवांवरही गर्दीचा परिणाम होऊ शकतो, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. कायदा-सुव्यवस्थेचाही विचार आंदोलनामुळे आझाद मैदान परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा संभाव्य त्रास, वाहतुकीवरील परिणाम आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन परवानगी नाकारण्यात आल्याचे समोर आले आहे. राज्यभरातून ओबीसी बांधव मुंबईत येणार होते १ सप्टेंबरच्या आंदोलनासाठी राज्यातील विविध भागांतून ओबीसी समाजाचे बांधव मुंबईत दाखल होणार होते. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता आंदोलनकर्त्यांची पुढील भूमिका काय असणार, याकडे लक्ष लागले आहे. पोलिसांच्या निर्णयावर ओबीसी समाजाचे नेते आणि आंदोलक काय भूमिका घेतात, तसेच आंदोलनाची पुढील दिशा काय ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. OBC आरक्षण संपलेय, आता तरी जागे व्हा!:लक्ष्मण हाके यांचा जरांगेंवर हल्लाबोल दरम्यान, “मनोज जरांगे यांचे आंदोलन मराठा समाजातील गरिबांसाठी नसून, सत्तेतील आजी-माजी आमदार आणि मंत्र्यांची बोगस कुणबी प्रमाणपत्रे वैध (Valid) करून घेण्यासाठी आहे. ‘कुणबीचा दाखला म्हणजेच मागासवर्गीय’ हा शासनाचा बेकायदेशीर जीआर ओबीसींच्या आरक्षणात माती कालवणार असून महाराष्ट्रातील ओबीसींचे आरक्षण आता संपले आहे,” असा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. १ सप्टेंबर रोजी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी दौंड येथून मुंबईकडे ‘संघर्ष यात्रा’ काढणार असून या दिवशी मुंबई आणि पुणे ठप्प करू, असा इशाराही त्यांनी दिला.
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस:12 सप्टेंबरला मराठा समाजाची बैठक, मुंबईतील आंदोलनाची घोषणा करण्याचा इशारा, विखे पाटील पुन्हा मध्यस्थी करणार? मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. अंतरवाली सराटीत सुरू झालेल्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असून, रात्री उशिरापर्यंत मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी दाखल होत आहेत. पहाटे ३ वाजेपर्यंतही आंदोलकांची ये-जा सुरू होती. अनेक आंदोलकांनी आंदोलनस्थळीच मुक्काम केला असून, पुढील काही दिवस अंतरवालीत थांबण्याची तयारी केल्याचे चित्र आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *