![]()
पैठण नगर परिषदेत गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या स्वीकृत नगरसेवक निवडीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष विद्या कावसानकर आणि मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष जितू परदेशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. पैठण नगर परिषदेतील २५ नगरसेवकांपैकी शिवसेना शिंदे गटाचे १७ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे २ नगरसेवक आहेत. निवडणुकीच्या वेळी खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांनी महायुतीच्या फॉर्मुल्यानुसार अजित पवार गटाला स्वीकृत सदस्य पद देण्याचा शब्द दिला होता, तो शब्द आता पाळला जात असल्याचे नगरसेवक बजरंग लिंबोरे यांनी सांगितले. जितू परदेशी यांच्या निवडीमुळे नगर परिषदेमध्ये अजित पवार गटाची ताकद अधिक भक्कम होणार आहे. नगर परिषदेत एकूण तीन स्वीकृत नगरसेवक निवडण्याची तरतूद आहे. मात्र, राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी होणाऱ्या विशेष सभेत केवळ राष्ट्रवादीच्या एकाच सदस्याची निवड केली जाईल.
Source link
आठ महिन्यांनंतर पैठण नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवकपदाची होणार निवड