![]()
ऑगस्ट महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने राज्यातील अनेक भागांत पावसाची तूट कायम आहे. मात्र, सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता असून, राज्यातील काही भागांत मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३ ते १० सप्टेंबरदरम्यान कोकणातील बहुतांश जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढू शकतो. विदर्भातील गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. काही भागांत वादळी वारेही वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनीही पिकांची आणि शेतातील साहित्याची आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाची हजेरी कोकण किनारपट्टीच्या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर ढगाळ वातावरण राहू शकते. विदर्भातील काही जिल्ह्यांत स्थानिक हवामान बदलांमुळे दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. १० सप्टेंबरनंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सक्रियता वाढू शकते. मात्र, १० सप्टेंबरनंतर राज्यातील पावसाचा जोर पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागांत अजूनही पावसाची तूट कायम असून, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. देशातही पावसाची तूट ऑगस्ट महिन्यात देशातील अनेक भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मान्सूनच्या आतापर्यंतच्या हंगामात देशात पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता कायम आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या सुरुवातीला होणारा पाऊस शेतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. हेही वाचा.. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस:प्रकृती खालावली तरी उपचार नाकारले; सरकारचे शिष्टमंडळ आज पुन्हा भेट घेण्याची शक्यता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील 11व्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. सलग उपोषणामुळे जरांगे पाटील यांची शुगर काही प्रमाणात खालावली असली, तरी त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. दरम्यान, रविवारी परभणीत झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार तोफ डागली. सविस्तर वाचा
Source link
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार सरींचा अंदाज, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम