![]()
पैशांच्या देवाण-घेवाणीवरून रविवारी (३० ऑगस्ट ) सकाळी एका ३२ वर्षीय तरुणावर भरचौकात लोखंडी हातोड्याने तसेच लाकडी दांडक्याने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. मदनी चौकातील टाकळकर सोसायटीजवळ सकाळी १०:१५ वाजेच्या सुमारास हा थरार घडला. फारेस अब्दुल अजीज अलकेसरी (३२, रा. पडेगाव) असे मृताचे नाव असून घाटीत उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात फारेसचा मित्र सय्यद शहेजाद अली हाही गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या काही तासांत आरोपी अहमद खलील बादाम (४०) आणि अदनान खलील बादाम (३५, दोघे रा. बारी कॉलनी) या दोन सख्ख्या आतेभावांना बेड्या ठोकल्या आहेत. फिर्यादी सय्यद शहेजाद अली ऊर्फ सिराज नासेर अली (३०, रा. पडेगाव) यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शहेजाद फर्निचरचे काम करतो. रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास फारेस त्याच्या घरी आला. त्यानंतर दोघे दुचाकीने फारेसच्या घरी गेले. तेथून कार घेऊन सेंट्रल नाका येथे कचरागाडी घेण्यासाठी आले. कचरागाडी घेऊन ते मदनी चौकातील टाकळकर सोसायटीजवळ पोहोचले. यावेळी आरोपी अहमद आणि अदनान हे मोपेडवरून तेथे आले. पैशांच्या व जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी वाद सुरू केला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. पैशांच्या वादातून सूड मृत फारेस हा आरोपींचा मामेभाऊ आहे. आरोपी अहमद व अदनान हे फारेसचे आतेभाऊ आहेत. आरोपींपैकी अहमद हा चालक आहे. अदनान हा जिम ट्रेनर आहे. पोलिस सूत्रांनुसार, त्यांच्यात पैशांवरून आणि कौटुंबिक कारणावरून दीर्घ काळापासून वाद सुरू होता.
Source link
पैशांच्या वादातून मामेभावाची हत्या:सख्ख्या भावांना बेड्या, कचरा गाडी आणायला गेलेल्या तरुणावर घाला