Headlines

महाजन, मुंडे, खडसेंनी भाजपला रुजवले- पवार:खडसेंच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्याकडे भाजप-सेना नेत्यांची पाठ




जनसंघ व भाजपचे स्थान महाराष्ट्रात मर्यादित होते; पण प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी पक्षाचे स्थान जनतेत रुजवले, पक्ष तळागाळापर्यंत पोचवला. मात्र भाजपने त्यांच्यावर अन्याय केला. विधानसभेत शेतकऱ्यांचे दुखणे मांडायचे असेल तर एकनाथ खडसेंना सोबत घ्यायला पाहिजे, हा निर्णय आम्ही घेतला, असे मत राष्ट्रवादी श. प पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त रविवारी कोथळी येथील मुक्ताई मंदिराच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. मात्र या कार्यक्रमाकडे जिल्ह्यातील सर्व भाजप- शिवसेना महायुतीच्या नेत्यांनी पाठ फिरवली. निधी थांबवण्याचे पाप केले नाही खडसे मुक्ताई मंदिरासाठी राज्य शासनाकडे १०० कोटींचा निधी मागितला होता, यापैकी केवळ २५ कोटी रुपये मंजूर झाले व त्यातील ९ कोटी रुपये मिळाले, अपूर्ण निधीमुळे मंदिराचे व पर्यटन विकासाचे काम थांबले आहे. मात्र आम्ही मंत्री असताना कधीही निधी थांबवण्याचे पाप केले नाही. संत मुक्ताई मंदिर व पर्यटन विकासाचे काम पूर्ण व्हावे ही इच्छाही या वेळी एकनाथ खडसे यांनी आपल्या भाषणातून बोलून दाखवली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *