![]()
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्रतेचा मुद्दा गाजत असून कुटुंबातील व्यक्ती करदाता असल्याने लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आला आहे. याबाबतची माहिती महिला व बाल कल्याण विभागाकडून संबंधित लाभार्थींना देण्यात येत असून विभागाच्या सूचना फलका
.
सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुती सरकाराने जून २०२४मध्ये मुख्यमंत्री लाकडी बहीण योजना जाहीर केली. त्यावेळी शासन आदेश जारी करून निषक, अटींचाही माहिती घोषित करण्यात आली. निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करीत तत्कालीन सरकाराने ही योजना जाहीर केली, असा शब्दात विरोधकांनी हल्लाबोल केला होता. त्यावेळी निकष, अटीच्या अनुषंगाने अर्जांची पडताळणी फारशी करण्यात आली नाही. योजनेचा राजकीय लाभही महायुतीला निवडणुकीत झाला होता. प्रारंभीच्या काळात तब्बल ४ लाख ५४ हजार ८९२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी गतवर्षीपर्यंत ४ लाख ३७ हजार ६२६ अर्ज महिला व बाल विकास विभागाच्या लेखी पात्र होते. मात्र नंतर निकष पुन्हा तंतोतंत लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली. सरकारी तिजोरीवर ताण वाढतच असल्याने आणि नजीकच्या काळात निवडणूक नसल्याने या योजनेच्या पात्रतेसाठीच्या निकष प्रभावीपणे लागू करण्यात येत आहे. त्यामुळे अपात्र लाभार्थींची संख्या वाढतच आहे. डिसेंबर २०२५पर्यंत ४ लाख ३७ हजार ६२६ अर्ज पात्र होते. त्यानंतर ईकेवायसी चुकणे, चार चाकी वाहने, आयकरची संबंधित, शिधापत्रिकेत दोनपेक्षा जास्त लाभार्थी असणे यासह अन्य कारणांमुळे आता सुमारे ४५ हजार ६०० लाडक्या बहिणींच्या लाभाला ब्रेक बसला आहे. आता आयकर दात्याच्या कुटुंबांतील बहिणींचा लाभ बंद झाला आहे. महिला व बाल कल्याण विभागाकडून लाभार्थींना माहिती देण्यात येत आहे. आपण मुख्यमंत्री माझी लाकडी बहीण योजनेच्या ई – केवायसी करताना आधार क्रमांक टाकला आहे. मात्र आधार कार्ड क्रमांक असलेली ही व्यक्ती करदाता असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लाभ बंद करण्यात आला असून, आपण अपात्र ठरत आहेत, असेही स्पष्ट केले आहे. ही माहिती आयकर विभागाच्या अहवालातून प्राप्त झाली आहे.
निवडणूक नसल्याने कात्री
आयकर विभागाचा हवाला