Headlines

Ambadas Danve Slams Maharashtra Govt Over Samruddhi Highway Safety


मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर सलग घडत असलेल्या लूटमार, वाहनांवर दगडफेक, डिझेल-बॅटरी चोरी, सीसीटीव्ही बंद असणे आणि पोलिस गस्तीच्या अभावाच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना

.

दानवे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून समृद्धी महामार्गावरील कथित गैरव्यवस्था आणि सुरक्षेतील त्रुटींची 12 मुद्द्यांमध्ये मांडणी केली. महामार्गावर 18 लाख रुपयांचा दरोडा पडतो, दरोडेखोरांकडून वाहनांचे टायर फोडले जातात आणि त्यानंतर तेच टायर बदलून देण्याइतपत त्यांची मजल जाते, असा गंभीर आरोप त्यांनी केला. याशिवाय पोलिसांची गस्त, सीसीटीव्ही व्यवस्था आणि आपत्कालीन यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दानवेंनी उपस्थित केलेले 12 प्रमुख मुद्दे

अंबादास दानवे यांनी ट्विटरवर सरकारला पुढील 12 सवाल केले आहेत: १. टोल वसुली आणि सुविधांचा अभाव: प्रति किलोमीटर २ रुपये टोल आकारूनही महामार्गावर प्रवाशांसाठी सुविधांचा पूर्णपणे अभाव आहे. २. १८ लाखांचा दरोडा: नुकतीच महामार्गावर १८ लाखांचा दरोडा पडल्याची अत्यंत गंभीर घटना घडली आहे. ३. चोरांची मग्रुरी: दरोडेखोरांनी टायर फोडल्यानंतर पुन्हा बदलून देण्याइतपत मग्रुरी आणि धाडस दाखवले आहे. ४. प्रवाशांमध्ये दहशत: महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांमध्ये आता प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ५. पोलिसांची शून्य गस्त: महामार्गावर पोलिसांची गस्त नावालाही शिल्लक नाही. ६. जनावरांचा मुक्त संचार: महामार्गावर अनेक ठिकाणी जनावरांचा मुक्त संचार सुरू असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. ७. डिझेल आणि बॅटरी चोरी: वाहने उभी असताना त्यांच्यातील बॅटऱ्या आणि डिझेल चोरी होण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. ८. महिलांच्या छेडछाडीची भीती: गुन्हेगारांकडून झाडांचा आडोसा घेऊन महिलांच्या छेडछाडीचा आणि हल्ल्याचा धोका वाढला आहे. ९. प्रवाशांना अमानुष मारहाण: प्रवाशांना अडवून चोरांकडून काठ्या आणि लाथा-बुक्क्यांचा मार खावा लागत आहे. १०. सीसीटीव्ही कॅमेरे बंद: कोट्यवधी रुपये खर्च करूनही महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. ११. बोगस आपत्कालीन यंत्रणा: आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी फोन केल्यास प्रतिसाद न देणारी बोगस यंत्रणा महामार्गावर काम करत आहे. १२. गॅस गळती व दगडफेक: महामार्गावर गॅस गळती आणि वाहनांवर दगडफेक होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

“तथाकथित इन्फ्रामॅनला धन्यवाद…”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत दानवे यांनी उपहासात्मक ट्विट केले, “धन्यवाद सो-कॉल्ड (तथाकथित) इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस! आम्हाला विश्वास आहे की आपण याविषयी साधी बैठक लावून यंत्रणेकडे डोळे वटारूनही बघणार नाहीत, खडसावणे किंवा जाब विचारणे तर दूरच राहिले.”

समृद्धी महामार्गावर घडले काय?

सिन्नर तालुक्यात दुसंगवाडी-मलढोण शिवारात गुरुवारी मध्यरात्री एकाच रात्री दरोड्यांच्या घटनांची मालिका घडली. रुग्णवाहिकेतून जाणाऱ्यांना मारहाण: हिंगोली येथील पांडुरंग माने हे एर्टिगा कारने एका अपघातग्रस्त आणि गंभीर रुग्णाला (अर्जुन खरात) उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात घेऊन जात होते. चेंबर फोडून दरोडा: रात्री १२.४० च्या सुमारास दरोडेखोरांनी रस्त्यावर टणक वस्तू फेकली. कार त्यावरून जाताच इंजिनचे चेंबर फुटून कार बंद पडली. अमानुष मारहाण व लूट: गाडीत गंभीर रुग्ण आहे, असे सांगूनही १२ ते १५ दरोडेखोरांनी काठ्या आणि लोखंडी गजांनी चालकासह प्रवाशांना अमानुष मारहाण केली आणि त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याची अंगठी असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज लुटला. यापूर्वी नांदेडचे कार व्यावसायिक मोहम्मद फरान आणि छत्रपती संभाजीनगरचे ॲड. श्रीकांत मिश्रा यांनाही याच पद्धतीने लुटण्यात आले होते.

लूट प्रकरणी वैजापूर पोलिसांकडून एकाला अटक

दरम्यान, समृद्धी महामार्गावरील एक्झिट क्र. १८ हडसपिंपळगावजवळ एका वाहनचालकाला मारहाण करून दीड लाखाची लूट केल्याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी २४ तासांच्या आत तपास करत एका संशयित आरोपीला अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

‘समृद्धी’वर 6 दिवस ट्रॅफिक ब्लॉक

इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) बसवण्यासाठी आणि गँट्री उभारण्यासाठी 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान सिन्नर-भरवीर आणि भरवीर-इगतपुरी मार्गावर ६ दिवस वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सिन्नर-भरवीर मार्ग: 31 ऑगस्ट, 1 आणि 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 1 (मुंबईकडे) आणि दुपारी 3 ते 4 (नागपूरकडे) वाहतूक थांबवली जाईल.

भरवीर-इगतपुरी मार्ग: 4, 5 आणि 7 सप्टेंबर रोजी याच वेळेत 45 ते 60 मिनिटांसाठी वाहतूक बंद राहील.

हेही वाचा…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्स बसची कंटेनरला धडक; एकाचा मृत्यू तर 10 प्रवासी गंभीर

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने पुढे चाललेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात वैजापूर येथील हेमंत दाभाडे (वय 65) यांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील 10 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.