![]()
मराठवाडा मित्र मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयाने (एम.एम.सी.ओ.ई.), पुणे, आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. महाविद्यालयाने बिंगहॅम्टन विद्यापीठ, स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (एस.यू.एन.वाय.) यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संधी उपलब्ध होणार आहेत. 3.5 + 1.5 एकात्मिक पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचा मार्ग हे या सहकार्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण पूर्ण करून पुढील उच्च शिक्षणासाठी बिंगहॅम्टन विद्यापीठात प्रवेशाची दिशा मिळेल. महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय संबंध कक्षाच्या प्रमुख डॉ. गिरिजा चिद्दरवार यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे अध्यक्ष बी.जी. जाधव, प्राचार्य डॉ. सचिन साखरे आणि उपप्राचार्य डॉ. स्वाती देशमुख यांचे या आंतरराष्ट्रीय उपक्रमांना प्रोत्साहन मिळाले. या सामंजस्य कराराचा उद्देश दोन्ही संस्थांमधील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक देवाणघेवाण, जागतिक अनुभव, उच्च शिक्षणाच्या संधी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि विविध सहकार्यात्मक उपक्रम अधिक सक्षम करणे हा आहे. या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या व्यापक संधी मिळून जागतिक शैक्षणिक वातावरणात उच्च शिक्षण घेण्याची क्षमता अधिक विस्तारेल, असे यावेळी सांगण्यात आले. बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) फेलोशिपधारक अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांचे गेल्या काही दिवसांपासून समाजकल्याण आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन सुरू आहे. १९ ऑगस्टपासून धरणे आंदोलन, तर 24 ऑगस्टपासून आमरण उपोषणास बसलेल्या या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची आणि मागण्यांची प्रशासनाने अजूनही दखल घेतलेली नाही. शासनाच्या जाचक अटींमुळे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जीवाची बाजी लावून उपोषणास बसलेल्या या विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य करून घेण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते राहुल डंबाळे उद्यापासून स्वतः उपोषण आंदोलनाला बसणार आहेत. प्रशासनाच्या आणि सरकारच्या ढिम्म कारभाराचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि हक्काची फेलोशिप मिळवण्यासाठी उद्या सर्व आंदोलक विद्यार्थी आणि कार्यकर्ते मिळून समाजकल्याण आयुक्तालयाला ‘टाळे ठोको’ आंदोलन करणार आहेत. याबाबत बोलताना राहुल डंबाळे म्हणाले, “सामाजिक न्याय विभागाकडे अतिरिक्त निधी उपलब्ध असतानाही, हजारो कोटी रुपये इतर विभागांना बेकायदेशीरपणे वळविले जात आहेत. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना फेलोशिप नाकारणे हा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळा आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. जोपर्यंत शासन 2023 च्या जाचक आणि अन्यायकारक अटी रद्द करत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा थांबणार नाही.”
Source link
पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ अभियांत्रिकीचा अमेरिकेच्या बिंगहॅम्टन विद्यापीठाशी सामंजस्य करार:विद्यार्थ्यांना मिळणार आंतरराष्ट्रीय शिक्षणाची संधी