Headlines

पुण्यात भाजप कार्यकारिणी:काँग्रेसच्या फेक नरेटिव्हविरोधात ‘नरेटिव्ह’ मजबूत करा- मुख्यमंत्री, भाषणातून कार्यकर्त्यांना दिला संदेश




देशाच्या विकासाची घोडदौड थांबवण्यासाठी विविध शक्ती कार्यरत असून काँग्रेस तसेच विरोधकांकडून समाजात संभ्रम आणि अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुण्यात केली. केवळ भाजपविरोधी राजकारण न करता संविधानाच्या नावाखाली समाजात गैरसमज पसरवण्याचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री प्रदेश कार्यकारिणीत बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेस व विरोधकांच्या ‘फेक नरेटिव्ह’चा मुकाबला करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी नव्या कार्यपद्धतीने काम करावे. युवा पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. राज्यातील १८ ते २६ वयोगटातील युवक-युवतींची मोठी संख्या लक्षात घेऊन, भाजप युवा मोर्चाने किमान दहा लाख युवा कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे उभारावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या वेळी राज्यातून पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात युवा मोर्चाने दहा लाख ‘वॉरियर्स’ तयार करावेत विरोधकांच्या कथानकाला केवळ सभांमधून उत्तर देऊन चालणार नाही, तर पारंपरिक माध्यमे सोडून युवकांच्या मोबाइलपर्यंत सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून पोहोचावे लागेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यातील दोन कोटी जेन-झी पिढीवर लक्ष्य केंद्रित करून युवा मोर्चाने दहा लाख ‘वॉरियर्स’ तयार करण्याचे लक्ष्य देताना भाजपच्या पुढील राजकारणाचा डिजिटल आराखडाच त्यांनी मांडला. युवकांची मोठी ताकद सामाजिक माध्यमांवर सक्रिय असल्याने आगामी निवडणुकांमध्ये बूथ व्यवस्थापनाइतकेच इन्स्टाग्राम, व्हिडिओ आणि डिजिटल संदेशांचे युद्ध महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *