![]()
शिंदेसेनेने राजकीय रणनीती अधिक आक्रमक केली आहे. षण्मुखानंद सभागृहात “विमुक्त दिना’निमित्त आयोजित “शिवसेना भटके-विमुक्त हक्क, न्याय व विकास परिषदे’च्या माध्यमातून राज्यातील भटके-विमुक्त आणि बहुजन मतदारांना आकृष्ट करण्यासाठी राजकीय कार्ड खेळले आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “अखिल भारतीय शिव भटके विमुक्त सेने’च्या स्थापनेची घोषणा केली. मंत्री संजय राठोड यांची “अखिल भारतीय शिव भटके विमुक्त सेने’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अडथळे दूर करू- संजय राठोड ५२ घटकांची ही अभूतपूर्व एकजूट आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ‘गेमचेंजर’ ठरू शकते. “स्वातंत्र्यानंतरही आपली स्थिती सुधारली नाही. आता ‘डीएनटी सेने’च्या माध्यमातून संघटित होऊन भविष्यातील प्रशासकीय अडथळे दूर करू,’ असे आवाहन संजय राठोड यांनी केले.
Source link
शिंदेसेनेकडून ‘अखिल भारतीय शिव भटके विमुक्त सेने’ची स्थापना:मुंबईत शक्तिप्रदर्शन, मंत्री संजय राठोड राष्ट्रीय अध्यक्षपदी