Headlines

ठाकरे पिता – पुत्राचे ‘मिशन मराठवाडा’:विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर दौरा




विधान परिषद निवडणुका आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर उबाठा पक्षाने मराठवाड्यात आपले राजकीय वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ‘मिशन मराठवाडा’ची जोरदार आखणी केली आहे. ३ सप्टेंबर रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरात दाखल होऊन “डेव्हलपमेंट डिलेड, डेव्हलपमेंट डिनाइड’ या भूमिकेतून सरकारचा हिशेब मागितला जाईल. १६ आणि १७ सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे संभाजीनगरात मुक्कामी आहेत. १७ सप्टेंबर या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून ठाकरे गट मराठवाड्याशी असलेले आपले पारंपरिक आणि राजकीय नाते अधिक घट्ट करण्याच्या तयारीत आहे. संघटना मजबूत करणार छत्रपती संभाजीनगर-जालना, बीड- लातूर- धाराशिव आणि नांदेड- हिंगोली- परभणी या विधान परिषद मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करत पक्षसंघटना मजबूत करणे हा या दौऱ्याचा मुख्य अजेंडा असल्याचे सांगण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *