माजी मंत्र्यांच्या पीएची जीवे मारण्याची धमकी आणि रुग्णालय प्रशासनाचा मानसिक त्रास यातून आलेल्या वैफल्यातून फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी स्वतःच्या हातावर ‘सुसाईड नोट’ लिहून आयुष्य संपवले. सायन रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या त
.
आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी आत्महत्या करायला नको होती. ‘राजेंद्र रुपनवर यांच्या तेथील डॉक्टरांच्या विरोधात तक्रार होत्या. त्यासाठी एक कमिटी नेमली. यात जे दोषी आढळले, त्यात वैद्यकीय अधीक्षकांना आम्ही निलंबित केले आहे. आपल्यावर अन्याय झाला तर आपण भांडले पाहिजे, आत्महत्या काय त्यावर उपाय नाही ती व्हायला नको होती. डॉक्टरांनी पोलिसांकडे सुद्धा तक्रार दिली होती. ही घटना दुर्दैवी आहे. आपण यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. अशी घटना कुठेही घडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जबाब बदलण्याच्या आरोप प्रकरणी पोलिस चौकशी होईल. जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई होईल. एखादं कोणी दोषी असेल, त्यांच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. यात फार बोलणे अपेक्षित नाही. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही.
दोषी आढळले त्यांच्यावर कारवाई करावी- रोहित पवार
आमदार रोहित पवार म्हणाले की, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि तेवढंच धक्कादायक आहे. मा. मंत्री तानाजी सावंत यांचा पीए प्रसाद देशमुख याने धमकाण्यासोबतच रुग्णालय प्रशासनाकडूनही त्रास दिल्याचा त्यांचा आरोप आहे. मागील वर्षी याच रुग्णालयात डॉ. संपदा मुंडे यांनीही आत्महत्या केली होती, त्यांच्या आत्महत्येनंतर पुढं काय झालं हे अजूनही स्पष्टपणे पुढं आलं नसताना आता डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी आत्महत्या केली. सामान्य माणसासाठी देवदूताच्या भूमिकेत असलेल्या डॉक्टरांचा असा छळ करुन त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडलं जात असेल तर हे संतापजनक आहे. सरकारने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करुन यातील दोषी कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.

फलटणच्या रुग्णालयात काय होते?- अंधारे
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी यापूर्वी फलटणच्या रुग्णालयात त्यांनी असा प्रयत्न केला होता. तानाजी सावंत यांचा पीए देशमुख यांने धमकी दिली होती तसे पत्र त्यांने आरोग्य संचालकाकडे देण्यात आले होते. रुग्णालय प्रशासनाने डॉक्टरांचीच चौकशी लावली होती. फलटणच्या रुग्णालयात नेमके असे काय होते की डॉक्टरांवर तिथे दबाव येतो. संपदा मुंडेंच्या वेळीसुद्धज्ञ असेच खोटे रिपोर्ट तयार करण्यास सांगितले होते. त्यांनी संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचा देखील उल्लेख केला आहे. या प्रकरणी मी मदने यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता.
नेमके प्रकरण काय?
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांचा मुंबईत उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांनी सायन रेल्वे स्थानक परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यानंतर त्यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी काही दिवसांपूर्वी माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पीए असल्याचा दावा करणाऱ्या प्रसाद कोंडे देशमुख याच्याकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा गंभीर आरोप केला होता. यासोबतच फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. लीला मदने यांच्याकडूनही आपल्याला सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रार त्यांनी केली होती. याच त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
हातावर लिहिली सुसाईड नोट
डॉ. रूपनवर यांनी आत्महत्येचे पाऊल उचलण्यापूर्वी स्वतःच्या हातावरच सुसाईड नोट लिहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर, त्यांनी 29 ऑगस्ट रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत आपल्या आत्महत्येबाबत पूर्वसूचनाही दिली होती. वाचा सविस्तर हे ही वृत्त वाचा
मुंबईतील मालाडमध्ये भीषण अपघात:भरधाव कारने 3 रिक्षा अन् दुचाकीला उडवले, महिला वकिलाचा मृत्यू, 20 जखमी

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड परिसरात रविवारी रात्री एक भीषण रस्ता अपघात घडला. या अपघातात 20 जण जखमी झाले असून, एका 35 वर्षीय महिला वकिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ॲड. प्रियांका मयंक सत्रा असे मृत महिलेचे नाव असून त्या मालाड पश्चिम येथील रहिवासी होत्या. अपघातातील आणखी एका जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. वाचा सविस्तर