![]()
सर्जन व्हाइस अॅडमिरल मनीष होनवाड (विशिष्ट सेवा पदक) यांनी पुण्यातील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाच्या (AFMC) संचालक व कमांडंटपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. वैद्यकीय, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील 37 वर्षांहून अधिक अनुभव असलेले होनवाड यांनी या
.
व्हाइस अॅडमिरल होनवाड यांनी 1989 मध्ये AFMC मधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1998 मध्ये त्यांनी याच महाविद्यालयातून भूलशास्त्र आणि अतिदक्षता वैद्यकशास्त्र विषयात MD पदवी संपादन केली. बंगळुरू येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य व न्यूरोविज्ञान संस्थेतून (निमहॅन्स) त्यांनी न्यूरो-अॅनेस्थेशियोलॉजीमध्ये जागतिक आरोग्य संघटनेची फेलोशिप पूर्ण केली आहे. तसेच, नवी दिल्लीतील भारतीय लोकप्रशासन संस्थेतून त्यांनी लोकप्रशासन विषयात M.Phil. पदवी मिळविली आहे.
आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी नौदल मुख्यालयात अतिरिक्त महासंचालक वैद्यकीय सेवा (नौदल), INHS संजीवनीचे कमांडिंग ऑफिसर तसेच INHS अश्विनीचे कमांडिंग ऑफिसर अशी प्रतिष्ठेची पदे भूषविली आहेत.
आरोग्यसेवा क्षेत्रातील सिम्युलेशन शिक्षणातील ते प्रमाणित प्रशिक्षक आहेत. अमेरिकेतील सोसायटी फॉर सिम्युलेशन इन हेल्थकेअरकडून त्यांना हे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. आरोग्यसेवा सिम्युलेशन विषयावर त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये व्याख्याने दिली आहेत.
रुग्णसेवा आणि सैनिकी वैद्यकीय सेवांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना 2025 मध्ये विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय नौदल प्रमुखांचे प्रशस्तिपत्र तसेच विविध फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ यांची प्रशस्तिपत्रेही त्यांना प्राप्त झाली आहेत.
सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या वतीने त्यांच्या AFMC च्या संचालक व कमांडंट म्हणून यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.