Headlines

राहुल गांधींवरील FIR विरोधात काँग्रेस आक्रमक:नांदेडमध्ये जोरदार निषेध मोर्चा, उत्तराखंडमधील भाजप कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी




काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुलजी गांधी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या कथित द्वेषपूर्ण एफआयआरच्या निषेधार्थ नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी महात्मा ज्योतिबा फुले आय.टी.आय. चौक येथे जोरदार निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र व भाजपविरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर हा राजकीय हेतूने प्रेरित असून, विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. कायदा सर्वांसाठी समान असावा, त्यामुळे उत्तराखंडमध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी संबंधित भाजप कार्यकर्त्यांविरुद्धही तातडीने एफआयआर दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. लोकशाहीत विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. राहुल गांधी यांच्यावरील कारवाई मागे घेऊन संबंधित प्रकरणात निष्पक्षपणे कायदेशीर प्रक्रिया राबवावी, अशी मागणीही करण्यात आली. या निषेध मोर्चात प्रदेश महासचिव सुरेंद्र घोडजकर, डॉ. रेखाताई चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, वरिष्ठ उपाध्यक्ष आनंद चव्हाण, महेश देशमुख तरोडेकर, माजी नगरसेवक अलीम खान, नगरसेवक सत्यपाल सावंत, रमेश गोडबोले, सुरेश हटकर, गगन यादव, महिला अध्यक्ष ज्योती कदम, नसीम पठाण, ब्लॉक अध्यक्ष रमेश चित्ते, आनंद कल्याणकर, दीपसिंघ हजुरिया, अंबादास रातोळे, मुरलीधर कल्याणकर, नागराज सुलगेकर, सय्यद रिहान, अब्दुल बाखी, गणेश कोकाटे, अब्दुल रशीद, अझर शेख, गौतम शिरसाठ, सादेक अली, श्याम पाटील, मो. मगदूम, कलीम शेख, धनंजय उमरीकर, गोविंद पाटील, मधुकर सोनटक्के, शितल जोंधळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चामुळे आय.टी.आय. चौक परिसरात काही काळ काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. घोषणाबाजी आणि निषेधाच्या फलकांमुळे परिसरात राजकीय वातावरण तापले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *