![]()
भगवान बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल यांच्यासारख्या लढवय्या, क्रांतिकारी पुरुषांची परंपरा लाभलेला आदिवासी समुदाय आहे. प्रसंगी मेळघाटातील आदिवासी वाघ, अस्वलांशी दोन हात करायलाही घाबरत नाही. त्यामुळे ही लढवय्यी प्रवृत्ती न विसरता अंधश्रद्धेला दूर सारून शिक्
.
धारणी तालुक्यातील डोमा येथील ज्या आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी भूतबाधेच्या कथित भीतीपोटी शाळेत न राहता घरी परत जाणे पसंत केले होते, त्या माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुक्काम केला. या वेळी विद्यार्थी, गावकऱ्यांशी झालेल्या संवादात त्यांनी ही मांडणी केली. माजी आमदार राजकुमार पटेल, आमदार केवलराम काळे, जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक निकेतन कदम, जि. प. सीईओ सत्यम गांधी, मेळघाटचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, उपविभागीय अधिकारी किसन तडवी यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यातून विचार मांडले. विद्यार्थी अंधश्रद्धेतून बाहेर निघावे, हे त्यांचे उद्दिष्ट होते. त्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी प्रशासनाचे हे चांगले पाऊल ठरले. शालेय जीवनातच आयएएस अधिकाऱ्यांच्या भेटीने प्रभावित होऊन आयएएस होण्याचा बांधलेला चंग जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. विद्यार्थी दशेतच काय व्हायच हे ठरवलं ते तुम्हीही करू शकता, असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला. सत्यम गांधी, सिद्धार्थ शुक्ला यांनी बीएची पदवी घेतली असली तरी आपण आयएएस झालो, हा प्रवास दुर्दम्य इच्छाशक्तीने मेहनतीने पूर्ण होऊ शकला, हेही त्यांनी स्पष्ट केले. या भेटीद्वारे प्रशासकीय अधिकारी असण्याच्या पलीकडे जाऊन एका पालकाच्या भूमिकेतून सर्वांनी या वेळी मांडणी केली. आश्रम शाळेत भूत असल्याच्या दाव्याविरुद्ध विज्ञानाची कास धरत अंधश्रद्धेला विरोध करण्याचे व वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. भविष्यातील विविध शैक्षणिक वाटचालींसाठी मार्गदर्शनही केले.
सनदी अधिकाऱ्यांनी केली पालकांच्या भूमिकेतून मांडणी