- Marathi News
- International
- The Homes Of 1.40 Crore People In Kolkata Mumbai Will Sink Into The Sea, The Sea Level Is Rising At An Unprecedented Rate
न्यूयॉर्क3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

समुद्राची वाढती जलपातळी मोठा धोका बनली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार दक्षिण आशियातील डेल्टा क्षेत्रांत कोलकाता, मुंबई आणि ढाकासारख्या शहरांमध्ये १ कोटी ४० लाखाहून अधिक लोकांना स्वतःची घरे गमावण्याचा तात्काळ धोका निर्माण झाला आहे. अहवालात म्हटले आहे की, समुद्राची पातळी विक्रमी वेगाने वाढतेय व हा वेग आणखी वाढू शकतो.
अहवालानुसार, २०१४ ते २०२३ दरम्यान जागतिक समुद्र पातळी सरासरी ४.७ मिलीमीटर प्रति वर्ष वाढली. २०२४ मध्ये ही वाढ वाढून ५.९ मिलीमीटर झाली. हिमनद्यांच्या वितळण्यामुळे व महासागरे तापल्याने हे संकट तीव्र होत आहे. जगात ७७ कोटी लोक अशा किनारपट्टीच्या भागात राहतात, जे हाय टाइड रेषेपासून ५ मीटरपेक्षा कमी उंचीवर आहेत.
ग्लोबल वॉर्मिंग: तापमान १.५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार?
जगाचे सरासरी तापमान वाढणे आता कमीत कमी १.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. युएनईपीच्या अहवालात इशारा दिली आहे की, २०१५ च्या पॅरिस हवामान करारात ठरलेली १.५ अंश सेल्सिअसची मर्यादा ओलांडणे आता अपरिहार्य आहे. तापमानात होणारी प्रत्येक वाढ उष्णतेची लाट, पूर, हिमनद्यांचे वितळणे, परिसंस्थेचे नुकसान व समुद्राच्या वाढत्या पातळीचा धोका वाढवेल.
शहरांतील आव्हाने काय?
अमेरिकेच्या मियामी आणि न्यूयॉर्क व चीनच्या ग्वांगझू सारख्या शहरांत किनारपट्टीवरील पायाभूत सुविधांची २० लाख कोटी ते २९.७५ लाख कोटी रुपयांपर्यंतची संपत्ती धोक्यात आहे. उच्च उत्पन्न असलेल्या शहरांमध्ये मुख्य चिंता आर्थिक नुकसान आहे, तर दक्षिण आशियाच्या भागांत मोठा धोका लोकांच्या विस्थापनाचा आहे.
- वाढत्या जलपातळीमुळे नुकसान? समुद्राची वाढती जलपातळी रस्ते, परिवहन, वीज आणि जल प्रणालींसारख्या पायाभूत संरचनेचे नुकसान करत आहे.
- समुद्र स्तर का वेगाने वाढला? प्रमुख कारण ग्लोबल वॉर्मिंग आहे. गरम महासागरांचे पसरणे व हिमनद्यांचे वितळणे समुद्राच्या पातळीला सतत वर उचलत आहे.