![]()
शेतकरी आणि सरकार यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरणारी मंडळ कृषी कार्यालये आणि उपविभागीय कृषी कार्यालये यांना टाळे ठोकण्यात येणार आहे. कृषी विभागाने तयार केलेला हा नवा आकृतिबंध मंत्रिमंडळाच्या मंजुरीपूर्वीच बाहेर आला आहे. यामध्ये फील्डवरील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून कार्यालयातील अतांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. या नवीन आकृतिबंधानुसार, कृषी विभागाच्या सर्वच योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आता अवघड होणार आहे. विभागाशी संबंधित कामे मंडळ किंवा उपविभागीय कार्यालयांमध्ये होणाऱ्या कामांसाठी आता त्यांना जिल्हा कार्यालयापर्यंत खेटे मारावे लागणार आहेत. नवीन आकृतिबंधाबद्दल कृषी विभागात असंतोष असून त्याचा पुनर्विचार करण्यासाठी तज्ज्ञ समितीची मागणी केली जात आहे. नंदुरबार : वनपट्टे वाढले, मात्र कृषी अधिकारी घटले 1. अक्राणी तालुक्यात 157 गावे आणि 1845 पाडे येतात. वन कायद्यामुळे येथे नव्याने दहा हजार हेक्टर कृषी क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, 24 सहायक कृषी अधिकाऱ्यांच्या जागी फक्त 7 अधिकारी नेमण्यात आले आहेत.
2. दुसरीकडे 23 सहायक कृषी अधिकाऱ्यांना मध्यस्थ कार्यालयांतून हलवून तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बसवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होईल. नाशिक : 8 फील्ड स्टाफला सांभाळण्यासाठी 5 लिपिक 1. 108 गावांपैकी 35 गावे शहरी क्षेत्रात असल्याने फक्त 50% क्षेत्रच कृषी विभागाच्या अखत्यारीत येते तरीही येथे कार्यालयात बसणाऱ्या 24 सहायक कृषी अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ करून ती 28 करण्यात आली आहे.
2. तर दुसरीकडे फील्ड कर्मचारी मात्र फक्त 8 आहेत. त्यांच्या आस्थापना सांभाळण्यासाठी 5 अतांत्रिक लिपिकांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांचे हाल, कर्मचारी नाराज डिजिटल योजनांचा बोजवारा ॲग्रिस्टॅक, फार्मर आयडी, डिजिटल क्रॉप सर्व्हे, पीएम किसान यांसारख्या केंद्र-राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांसाठी तांत्रिक मनुष्यबळची गरज असताना तेच कमी केल्याने योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होऊ शकतो. क्षेत्रीय कार्यालयांना टाळे मंडळ कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालये बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय कामांसाठी थेट जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात खेटे मारावे लागणार आहेत. अतांत्रिक कर्मचाऱ्यांची फुकटची फौज तांत्रिक पदांची कोणतीही मागणी नसताना कार्यालयांमध्ये अनावश्यक अतांत्रिक पदांची निर्मिती करून शासनाच्या तिजोरीवर ताण टाकला जात आहे. नियुक्त्या आणि बदल्या आपल्या अधिपत्याखाली राहाव्यात यासाठी आस्थापना विभागाविरोधात कृषी यंत्रणेचा काम बंद आंदोलनाचा इशारा.
Source link
कृषी विभागाचा आकृतिबंध मंत्रिमंडळाच्या मंजुरीपूर्वीच फुटला:मंडळ कृषी आणि उपविभागीय कृषी कार्यालये हाेणार बंद; अनावश्यक अतांत्रिक पदांमध्ये केली वाढ