![]()
युवा स्वाभिमान पार्टीची रविवारी ६ सप्टेबरला होणारी विदर्भस्तरीय दहिहांडी रद्द करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटनेला दहीहंडी समर्पित करून मृत्यूमुखी पडलेल्या बालकांना श्रद्धांजली अर्पण केल्याची माहिती आ. रवी राणा यांनी बुधवारी २ सप्टेंबरला दुपारी १ वाजता वायएसपी-भाजप भवन, शंकरनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. दहीहंडीसाठी कौल घेतला का, असे विचारले असता आ. राणा यांनी होय, कौल घेतला. त्यात बहुतेकांनी दहीहंडी घ्यावी अशी सूचना केली होती. परंतु, डफरीनमधील आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा विषय संवेदनशील आहे. माजी खा. नवनीत राणा यांनीही दहीहंडी रद्द करण्याबाबत पत्र दिले होते. त्याची दखल घेत दहीहंडी रद्द केली असून, सुमारे ५० लाख मृत बालकांचे नातेवाईक, रुग्णालयांत उपचार घेणारे बालक, सामाजिक कामांसाठी मदतीच्या रूपात दिले जाणार आहेत. आम्ही संस्कृती जपत जल्लोष न करता नवाथे चौकात स.१० वाजता दहिहांडीची परंपरा कायम ठेवत गाजावाजा न करता बालगोपालांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण यांचे पूजन करून दहीहंडी फोडणार- बाल गोपालांचा आनंद कायम ठेवत राधा-कृष्ण सजावट स्पर्धेचे आयोजन करणार आहोत. आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. मात्र, नेते, अभिनेते यावेळी येणार नाहीत, असे राणा यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या चर्चे वरुन व माजी खासदार व भाजप नेत्या नवनीत राणा यांनी पत्राद्वारे केलेल्या विनंतीनुसार नवाथे चौकसह परतवाडा, धारणी, अंजनगाव सुर्जी व तिवसा येथील दहिहांडी कार्यक्रम रद्द केल्याचेही त्यांनी सांगितले.
Source link
विदर्भस्तरावरील दहीहंडी युवा स्वाभिमानकडून रद्द:आमदार रवी राणा यांची पत्रकार परिषदेत माहिती