![]()
मध्य प्रदेश व लगतच्या परिसरावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तसेच ईशान्य अरबी समुद्रातील हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे राज्यात पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे. पुढील 4 दिवस राज्यातील बहुतांश भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज मुंबई हवामान विभागाने वर्तविला आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी मध्य प्रदेशापर्यंत सरकले. या प्रणालीमुळे बुधवारी विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने, गुरुवारी विदर्भातील अमरावती व गोंदिया जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. यासह विदर्भातील इतर जिल्हे, उत्तर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस बंगालच्या उपसागरातील नवीन हवामान प्रणाली मध्य भारताकडे (ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश) सरकत आहे. यामुळे 4 ते 10 सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाचा अंदाज असून विदर्भ व मराठवाड्यात हा बदल अधिक प्रकर्षाने जाणवेल. -माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ, नाशिक छत्रपती संभाजीनगरात आज सोसाट्याचे वारे;पावसाचीही शक्यता छत्रपती संभाजीनगर शहरात गुरुवारी (3 सप्टेंबर) दुपारनंतर किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यादरम्यान 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरात बुधवारी (2 सप्टेंबर) कमाल तापमान 29.8 अंश, तर किमान तापमान 22.0 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तसेच दिवसभरात ०.२ मिमी पावसाची नोंद झाली असून, सकाळी हवेतील आर्द्रता 85 टक्के तर सायंकाळी 69 टक्के होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 4 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहणार असून पावसाच्या एक-दोन सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगावात ढगाळ वातावरणाने तापमानात 3 अंशांची घट; गारवा वाढला गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात लक्षणीय बदल झाला आहे. दिवसभर दाटून येणारे ढग व अधूनमधूनपडणाऱ्या हलक्या सरींमुळे कमाल तापमानात 3 अंशांनी घट झाली आहे. हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे पहाटे व रात्री गारवा जाणवू लागला आहे.असे वातावरण काही दिवस राहील असे हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. पुढील 4 दिवस हलक्या सरी 3 सप्टेंबर : काही भागांत हलक्या तेमध्यम सरी बरसण्याचा अंदाज.
4 सप्टेंबर : जिल्ह्यात तुरळक ठिकाणीहलका पाऊस पडण्याची शक्यता.
5 सप्टेंबर : काही निवडक भागांतरिमझिम व हलक्या सरी.
6 सप्टेंबर : वातावरण ढगाळ राहीलआणि शहरसह जिल्ह्यात केवळ तुरळकठिकाणी पावसाची नोंद होईल.
Source link
राज्यात पुढील चार दिवस पाऊस:मराठवाड्यासह विदर्भ चिंब होणार; अमरावती, गोंदियात आज ‘ऑरेंज अलर्ट’