Headlines

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्या, युवा मित्र मंडळ, पुसल्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन‎




शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी त्यांच्या खात्यात ५ हजार रुपये अग्रिम मदत जमा करण्याची घोषणा केल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र, या मदतीच्या रक्कमेसंदर्भात शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.सध्या शेतकरी बांधवांना पाणीटंचाई, शेतीच्या उत्पादन खर्चात झालेली मोठी वाढ, वाढती महागाई आणि पावसातील खंडामुळे पिकांचे होणारे नुकसान अशा अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत केवळ ५ हजार रुपयांच्या मदतीत शेतकऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड कशी होणार, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वरुड-मोर्शी तालुका हा प्रमुख संत्रा उत्पादक भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, यावर्षी पावसातील खंड आणि वाढता उत्पादन खर्च यांमुळे संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.संत्रा बागांच्या देखभालीसाठी लागणारा खर्च, पाणी व्यवस्थापन, खते, औषधे व इतर कृषी निविष्ठांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ५ हजार रुपयांची मदत ही शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत अत्यंत अपुरी आहे. दिवाळीसारखा महत्त्वाचा सण जवळ आला असताना शेतकऱ्यांसमोर घरखर्च, किराणा, मुलांचे शिक्षण, औषधोपचार, कपडेलत्ते तसेच आगामी हंगामासाठी लागणारा शेतीचा खर्च अशा अनेक जबाबदाऱ्या आहेत. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सण साजरा करणेही कठीण झाले आहे.त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणींचा गांभीर्याने विचार करून त्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्याच्या कष्टाचा आणि संकटांचा विचार करून शासनाने केवळ तुटपुंजी मदत न देता भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, हीच अपेक्षा आहे. या प्रसंगी उपाध्यक्ष जावेद शेख, सहसचिव धीरज सावरकर, सागर फरतोडे, पिंटू कोरडे, प्रमोद पाटील,अमर इवनाते,कमलेश खपरीये, विलास मरकाम, सुरज भाकरे,मिलींद कांडलकर व शेतकरी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *