Headlines

राहुल गांधींविरुद्ध ‘एफआयआर’च्या‎निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे धरणे आंदाेलन‎:अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन सादर



लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर दाखल केलेल्या एफआयआरचा निषेधार्थ काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्त् यांनी बुधवारी २ सप्टेंबरला येथील जिल्हाकचेरीसमोर निदर्शने करीत धरणे आंदोलन केले. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, मनपाचे विरोधी पक्षनेत

.

आंदोलनानंतर अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांना काँग्रेस पक्षाच्यावतीने निवेदन सादर केले. हल्दवानी येथील घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर एफआयआर दाखल करावा, कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, लोकशाही व्यवस्थेत राजकीय मतभेद असू शकतात; मात्र कोणत्याही राजकीय नेत्याच्या सभास्थळी जातीय किंवा भेदभावपूर्ण मानसिकतेचे प्रदर्शन करणे हे सामाजिक सलोखा, समानता, संविधानिक मूल्यांच्यादृष्टीने गंभीर बाब आहे.

दरम्यान राहुल गांधी यांच्याविरुद्धच एफआयआर दाखल करण्यात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. अन्याय, भेदभाव आणि संविधानिक मूल्यांच्या अवमानाविरोधात आवाज उठविणे हा गुन्हा नसून लोकशाहीतील जबाबदारी आहे,” अशी भूमिका काँग्रेसने यावेळी मांडली.सामाजिक न्याय, समानता, बंधुता, प्रत्येक नागरिकाच्या प्रतिष्ठेचे संरक्षण ही संविधानाची मूलभूत मूल्ये आहेत. या मूल्यांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही कृत्याचा निषेध करणे,संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी करणे हा लोकशाहीवादी नागरिकाचा अधिकार आहे, असेही सांगण्यात आले.

आंदोलनात प्रदेश महासचिव किशोर बोरकर, प्रदेश सचिव हाजी नजीर खान, अशोक डोंगरे, संजय वाघ, विनोद मोदी, सलीम मिरावाले, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे, डॉ.अर्चना आत्राम, राजश्री जठाळे, सुजाता झाडे, वंदना थोरात, मैथिली पाटील, जयश्री मरापे, शिल्पा राऊत, कीर्तिमाला चौधरी, किरण चांदवडकर, कांचन खोडके, अशोक डोंगरे, मुन्ना राठोड, अभिनंदन पेंढारी, विजय वानखडे, अविनाश पांडे, विजय देशमुख, समीर जावंजाळ, संकेत कुलट, वैभव देशमुख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

घोषणांनी दणाणला परिसर आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘राहुल गांधी यांच्यावरील एफआयआर मागे घ्या!’, ‘हल्दवानी घटनेतील दोषींवर एफआयआर दाखल करा’, ‘संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा’, ‘संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही’, ‘अन्यायाविरोधातील आवाज दाबला जाणार नाही’ ‘राहुलजी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है’ ‘भारतीय जनता पक्षाचा निषेध असो’ अशा जोरदार घोषणा देण्यात आला. या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *