![]()
अहिल्यानगर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीची पहिली महासभा सभापती दीपाली बारस्कर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शहरातील महिला व बालकांच्या आरोग्य, शिक्षण, क्रीडा, महिला बचत गट, स्वच्छतागृह, अंगणवाडी, शाळा खोल्या व योगाभवन आ
.
सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार बजेटच्या पाच टक्के म्हणजे २ कोटी ५५ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. महिला व बालकल्याण समितीसाठी बजेटच्या पाच टक्के निधीची स्वतंत्र तरतूद करून दर महिन्याला स्वतंत्र खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या निधीतून महिला व बालकांसाठी आवश्यक विकासकामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शहरातील विविध ओपन स्पेसमध्ये महिलांसाठी ओपन जिम उभारण्यासाठी ६४ लाख, मुलांसाठी खेळणी बसविण्यासाठी ३४ लाख रुपये मंजूर करण्यात आले.
पाईपलाईन रोड व भिस्तबाग येथील ओपन स्पेसमध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रत्येकी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. अर्धांगवायू झालेल्या महिलांसाठी बेड खरेदीसाठी पाच लाख, बचत गटांच्या प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी २५ लाख आणि अंगणवाडी केंद्रासाठी २० लाख रुपये मंजूर झाले.सभापती दीपाली बारस्कर यांनी महापालिका आरोग्य विभागात नर्स, भूलतज्ज्ञ व डॉक्टरांची मानधनावर नियुक्ती करण्याची मागणी केली.
तसेच महिलांसाठी स्वच्छतागृह व पिंक ग्राउंड उभारण्याची सूचना केली. उपसभापती वर्षा सानप यांनी अंगणवाडीतील पोषण आहाराचा दर्जा सुधारण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. महिला व बालकल्याणाच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून मार्च २०२२ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी समिती सदस्य पुष्पा बोरुडे, रोशनी त्रिंबके, सुनिता भिंगारदिवे, मंगल लोखंडे, अश्विनी लोंढे, अनिता शेटीया, रूपाली दातरंगे व शेख शहनाज यांनी महिला व बालकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून आवश्यक सूचना मांडल्या.