Headlines

फडणवीसांना दिल्लीत बोलावून उपपंतप्रधानपद देण्याची शक्यता:गृहमंत्री कधीच पंतप्रधान होत नाही, संजय राऊतांचे मोठे विधान




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावून एक मोठी जबाबदारी द्यायची आहे. दिल्लीबाहेर असलेल्या एका नेत्याची उपपंतप्रधानपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही हीच भूमिका असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांचा वारसदार म्हणून ज्या व्यक्तीची निवड होईल, त्यांनाच उपपंतप्रधानपद दिले जाण्याची चर्चा आहे. संघाची भूमिका लवकरच समोर येईल. ती व्यक्ती सध्या दिल्लीत नसून देवेंद्र फडणवीस यांना ही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, एवढी माहिती माझ्याकडे आहे. मंदिराला व्यावसायिक स्वरुप देण्याचा प्रयत्न संजय राऊत म्हणाले की, राम मंदिराला सीईओ देत त्यांचा व्यापार करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. जेडीपीचा आकडा फुगवत देशातील जनतेला फसवले जात आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांना मोफत राशन आणि महिलांना पैसे देण्याची सवय लावत देशाचे जीडीपी कसा वाढेल असा सवाल राऊत यांनी केला आहे. मोदींचा फोटो काढला म्हणून देशद्रोह झाल्यासारखा लगेच अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला ही कुठली व्यवस्था आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात अंतर्गत तीव्र असंतोष संजय राऊत म्हणाले की, आपल्या देशाचा इतिहास पाहिला तर गृहमंत्री राहिलेली कोणतीही व्यक्ती पंतप्रधान झालेली नाही. अमित शहा यांना पंतप्रधान होण्याची तीव्र इच्छा आहे, पण ते शक्य होणार नाही. जर मंत्रिमंडळात फेरबदल करायचे असतील तर आधी अमित शहा यांचा राजीनामा घ्या, मगच आम्ही राजीनामा देऊ, असा इशारा काही वरिष्ठ मंत्र्यांनी थेट पंतप्रधानांना दिला आहे. अन्यथा तुम्ही आम्हाला बाजूला काढा असे काही संघाच्या जवळील मंत्र्यांनी मोदींना सांगितले आहे. एकनाथ शिंदेंवर निशाणा संजय राऊत म्हणाले की, शिंदे गटाच्या वकिलांचे आकडे ऐकून तुम्हाला चक्कर येईल. मूळ प्रश्न पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाले आहे की नाही, एवढाच आहे. शिवसेनेच्या घटनेमुळेच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाला पदे मिळाली, आणि आज तेच या घटनेवर प्रश्न उपस्थित करत रडगाणे गात आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख आणि इतर सर्व नेत्यांची निवड पूर्णपणे लोकशाही मार्गानेच झाली असून निवडणूक आयोगाबाबतची आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडणे योग्य ठरणार नाही, असेही राऊतांनी स्पष्ट केले.

हे ही वृत्त वाचा पुण्यात मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा:रीलस्टार संतोष पंडित यांना मध्यरात्री अटक, व्हिडिओच्या माध्यमातून अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप
पुण्यातील रीलस्टार आणि यू-ट्यूबर संतोष पंडित यांना पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान पंडित यांच्या राहत्या घराबाहेर चांगलाच हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *