![]()
शुक्रवारी पहाटे २.४५ वाजता आकाशवाणी चौकातील एशियन हॉस्पिटलमधील लहान मुलांच्या एनआयसीयू विभागात एसीतील शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या विभागात ९ बालक उपचार घेत होते. त्यातील पाच बालकांना घाटीत, तिघांना एमजीएम तर एकास संजिवनी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमनच्या पाच गाड्या पोहोचल्या. अग्निशमनच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १० ते १५ मिनिटांत आग आटोक्यात आणली. या दरम्यान जवाहरनगर पोलिस, आरसीबी जवान पोलिस बंदोबस्तासह घटनास्थळी हजर झाले. यावेळी ३० रुग्णवाहिका रुग्णांना हलविण्यासाठी हजर झाल्या होत्या. आगीची माहिती कळताच अग्निशमनच्या पाच गाड्या पोहोचल्या. अग्निशमनच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १० ते १५ मिनिटांत आग आटोक्यात आणली. या दरम्यान जवाहरनगर पोलिस, आरसीबी जवान पोलिस बंदोबस्तासह घटनास्थळी हजर झाले. यावेळी ३० रुग्णवाहिका रुग्णांना हलविण्यासाठी हजर झाल्या होत्या. आग लागलेल्या पहिल्या मजल्यावर ५८ रुग्ण एनआयसीयू हा विभाग पहिल्या मजल्यावर असून, या विभागात एकूण ९ बालके होते. तसेच जनरल विभागात एकूण ३६ रुग्ण तर स्पेशल स्यूटमध्ये १३ रुग्ण असे एकूण ५८ उपचार घेत होते.
Source link
संभाजीनगरात एशियन हॉस्पिटमध्ये ‘एनआयसीयू’ विभागात पहाटे आग:9 लहान मुलांना विविध रुग्णालयात हलविले