![]()
ना कोणती मोठी इमारत, ना हायफाय कॉन्व्हेंटची झगमगाट! जामखेड तालुक्यातील देवदैठण गावाच्या एका छोट्याशा धनगरवस्तीवर भरणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेने थेट राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचे लक्ष वेधून घेतले. नाविन्यपूर्ण प्रयोग आणि लोकसहभागातून कात टाकणाऱ्या य
.
राज्यातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि शाळांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने चार तासांची बैठक आयोजित केली होती. यासाठी राज्यभरातून उल्लेखनीय व पथदर्शी काम करणाऱ्या मोजक्याच उपक्रमशील शिक्षकांना पाचारण करण्यात आले होते. यात जामखेडच्या दुर्गम भागातील धनगरवस्ती शाळेचे उपक्रमशील शिक्षक लहू बोराटे यांचा समावेश होता. बोराटे यांनी डिजिटल शिक्षण, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ आणि लोकसहभागातून शाळेचा झालेला कायापालट शिक्षणमंत्र्यांसमोर प्रभावीपणे मांडला.
या बैठकीस शिक्षण सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, शिक्षण संचालक शरद गोसावी, उपसंचालक तेजराव काळे, रमाकांत काटमोरे, माजी उपसंचालक कमलादेवी आवटे यांच्यासह दत्तात्रय वारे, संदीप पवार, संदीप वाकचौरे, भरत काळे, बाबू मोरे, जोशी हे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी संपूर्ण शिक्षण विभागाचा आढावा घेत ग्रामीण भागातील असे प्रयोग राज्यभरात कसे राबवता येतील, यावर चर्चा केली.
^दुर्गम भागातील शाळेची दखल थेट शिक्षणमंत्र्यांनी घेणे, हा केवळ माझा नव्हे तर धनगरवस्तीवरील मुले, पालक , देवदैठण ग्रामस्थांच्या कष्टाचा अन् दात्यांच्या पाठबळाचा सन्मान आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, गटविकास अधिकारी शुभम जाधव, गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदार्डे यांच्या मार्गदर्शनामुळेच हा टप्पा गाठता आला. -लहू बोराटे, उपक्रमशील शिक्षक, धनगरवस्ती जि. प. शाळा.