Headlines

हिंगोलीत सायबर भामट्यांचा धुमाकूळ:बँकेची बनावट ॲप फाईल डाऊनलोड करताच 1.45 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल




हिंगोली शहरालगत रामाकृष्ण नगर भागात महिलेने युको बँकेच्या नावाने आलेली एपीके फाईल डाऊनलोड करताच सायबर भामट्यांनी पाच वेळेस एकूण १.४५ लाख रुपये काढल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी ता. ५ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरालगत रामाकृष्णनगर भागात अश्‍विनी मरळे ह्या कुटुंबासह राहतात. त्यांचे युको बँक शाखा हिंगोली येथे बँक खाते आहे. ता. ३० ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर युको बँकेच्या नावाने एपीके फाईल आली होती. सदर फाईल त्यांनी डाऊनलोड केली. मात्र यावेळी सायबर भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून पहिल्यावेळी ४९ हजार रुपये काढले. आपल्या बँक खात्यातून पैसे गेल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यानंतर भामट्यांनी दुसऱ्या टप्यात ४० हजार, तिसऱ्या टप्प्यात ५ हजार, चौथ्या टप्यात १० हजार तर पाचव्या टप्यात २५ हजार रुपयांची रक्कम काढली. दरम्यान, पाचव्यावेळी पैसे काढल्याच्या मेसेज आल्यानंतर त्या घाबरून गेल्या. त्यांनी तातडीने बँकेत जाऊन पाहणी केली. यामध्ये त्यांच्या बँक खात्यातून पाचवेळेस एकूण १.४५ लाख रुपयांची रक्कम काढण्यात आल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी बँकेकडे तक्रारही केली. त्यानंतर आज त्यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी सायबर भामट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक भालचंद्र मेथेकर, जमादार संतोष सोनपावले पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *