Headlines

अमरावतीच्या शिक्षकांचे शिक्षण आयुक्त कार्यालयावर आंदोलन:संच मान्यतेच्या अन्यायकारक निकषांना विरोध; महासंघ आणि विज्युक्टाचा सहभाग




ऑनलाइन संचमान्यतेच्या अन्यायकारक निकषांविरोधात राज्यातील शिक्षकांनी पुणे येथे आंदोलन केले. महासंघ आणि विज्युक्टाच्या नेतृत्वात हा महामोर्चा शिक्षण आयुक्त कार्यालयावर काढण्यात आला. या आंदोलनात अमरावतीच्या शिक्षकांनीही सक्रिय सहभाग घेतला. डॉ. अविनाश बोर्डे यांनी मोर्चाला संबोधित करताना सांगितले की, संच मान्यतेचे हे निकष हजारो शिक्षकांचा कार्यभार संपवण्याचा डाव आहे. शुक्रवारी पुणे येथे हा महामोर्चा काढण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, कार्याध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर, कोषाध्यक्ष डॉ. अशोक गव्हाणकर, प्रा. लक्ष्मण रोडे, प्रा. संतोष फाजगे आणि प्रा. रवींद्र पाटील यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. शिक्षण सहआयुक्त डॉ. श्रीराम पानझाडे यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले. त्यानंतर शिक्षण संचालक महेश पालकर यांच्यासोबत चर्चा झाली. शासन पातळीवर हा विषय घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी मान्य केले. या आंदोलनात प्रा. रमेश खाडे, प्रा. डी.एस. राठोड, प्रा. भाऊ गोरे, प्रा. अनिल काळे, डॉ. अभिजित पोटले, प्रा. संतोष कुटे, प्रा. संतोष अहिर, प्रा. रमेश जोल्हे, प्रा. संजय देवतळे, डॉ. चेतन हिंगणीकर, डॉ. प्रवीण चटप, प्रा. विजय कुतरमारे, प्रा. श्रीराम पालकर, प्रा. प्रदीप शेवतकर, प्रा. संजय गोळे, प्रा. नानासाहेब निवल, प्रा. अरुण मेश्राम आणि प्रा. गौरव काकडे यांसारखे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी अधिकाऱ्यांसमोर काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. यात तुकडी टिकवण्यासाठी प्रचलित निकष कायम ठेवणे, प्रात्यक्षिकासाठी विद्यार्थ्यांची संख्या २० ठेवणे, ४५ मिनिटांची तासिका ठेवणे, मुलींची संख्या विचारात घेऊन तुकडी टिकवणे आणि तुकडीसाठी किमान विद्यार्थी संख्या पूर्वीप्रमाणेच ठेवणे यांचा समावेश होता. अनुदानाच्या टप्प्यासाठी शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना कोणतीही अडचण येणार नाही, यावरही सकारात्मक चर्चा झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *