![]()
उन्नती शिक्षण संस्था संचलित ज्ञानेश विद्या मंदिर माध्यमिक व हेरंब प्राथमिक विद्या मंदिर मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. या प्रसंगी ज्ञानेश विद्या मंदिर माध्यमिक शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका स्वीकारून, इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. यात माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक म्हणून एहेम पवार तर उपमुख्याध्यापक म्हणून आनंद वाघुंडे यांनी भूमिका स्वीकारली पर्यवेक्षक म्हणून आस्था शुक्ला व आर्या जयस्वाल यांनी काम पाहिले, प्राथमिक विभागात मुख्याध्यापिका म्हणून भाग्यश्री चौधरी व उपमुख्याध्यापिका म्हणून सायली पगडे यांनी काम पाहिले, साई जगताप, अंश जाधव,नवनाथ शिंदे, मनीष सोनवणे, महेश आव्हाड, आशिष मस्के, साई शिंदे यांनी सेवकाची भूमिका घेऊन उत्कृष्टपणे काम केले याप्रसंगी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून आज रोजी विद्यार्थ्यांना अध्यापन करताना ज्या विद्यार्थ्यांनी सर्वात उत्कृष्ट अध्यापन केले. ज्यांनी सेवकांनी उत्तमरीत्या भूमिका बजावून त्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेतर्फे स्वागत करून त्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. या प्रसंगी आजचे दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक यांचे शाळेतर्फे स्वागत करण्यात आले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या सचिव मीनाक्षीताई विटोरे मॅडम संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र विटोरे सर संस्थेच्या उपाध्यक्ष पूजा पऱ्हे मॅडम तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक व शाळेतील सर्व शिक्षकांचे संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. आज रोजी अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी निवडक विद्यार्थ्यांनी अध्यापन करत असताना, आलेले अनुभव व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र विटोरे सर संस्थेच्या सचिव मीनाक्षी विटोरे मॅडम उपाध्यक्ष पूजा पऱ्हे मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री शिवपुरे मॅडम उपमुख्याध्यापक ए. एच. पंडूरे व सुभाष कुंढारे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पी. जी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन शिवांजली शेळके हिने केले. तर आभार प्रदर्शन साक्षी सोनवणे हिने केले कार्यक्रमाची सांगता. पसायदानाने करण्यात आली.
Source link
ज्ञानेश विद्या मंदिरात शिक्षक दिन उत्साहात साजरा:विद्यार्थ्यांनी लिलया पेलली शिक्षकांची भूमिका