Headlines

खारवगळ नाल्यात ट्रॅक्टर-ट्रॉलीसह शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण:पक्का पूल बांधण्याच्या मागणीसाठी, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष




चांदूर रेल्वेच्या घुईखेड परिसरातील शेतकऱ्यांनी खारवगळ नाल्यात ट्रॅक्टर-ट्रॉलीसह बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतात जाण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या या नाल्यावर पक्का पूल बांधण्याची त्यांची मुख्य मागणी आहे. शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबरपासून हे आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे, नाल्याच्या पाण्यात ट्रॅक्टर-ट्रॉली उभी करून, त्यात बसून उपोषण केले जाईल. यामुळे प्रशासनाचे या आंदोलनाकडे किती गांभीर्याने लक्ष लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. खारवगळ नाल्याच्या पलीकडे मोठ्या प्रमाणात शेती आहे. पावसाळ्यात नाला दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांचा शेताकडे जाणारा मार्ग धोकादायक बनतो. पाण्याची पातळी वाढल्यावर शेतकरी आणि शेतमजुरांना जीव धोक्यात घालून नाला ओलांडावा लागतो. यामुळे शेतीची कामे, पिकांची निगा राखणे आणि शेतमालाची वाहतूक यावर मोठा परिणाम होतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक वर्षांपासून पुलाची मागणी करूनही केवळ आश्वासने मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. ‘पूल बांधण्याचे आश्वासन नको, प्रत्यक्ष काम सुरू करा,’ अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. नाल्यातील पाण्यामुळे शेतीचे नुकसान होत असतानाच, शेतकऱ्यांच्या ये-जा करण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे केवळ पुलाचे बांधकामच नव्हे, तर नाल्याच्या पाण्याचा योग्य निचरा, पाणीप्रवाह आणि परिसरातील शेतीचे होणारे नुकसान यावरही कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकरी पाण्यात उतरून आंदोलन करत असल्याने, प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने तोडगा काढणार की आंदोलनाला सामोरे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *