Headlines

Supreme Court Slams Shiv Sena Corporator Ramesh Mhatre Over Hospital Assault


कल्याणमधील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “अशा लोकांना मोकळेपणाने रस्त्यावर फिरण्याचा कोणताही अ

.

न्यायमूर्तींची कडक भूमिका आणि राज्य सरकारला नोटीस

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, न्यायालयाचा आक्रमक पवित्रा पाहून म्हात्रे यांचे वकील, ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांनी ही याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली. खंडपीठाने ती फेटाळून लावत याचिका मागे घेण्यास परवानगी दिली.

दुसरीकडे, रमेश म्हात्रे यांचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या ‘विशेष अनुमती याचिकेची’ (SLP) मात्र सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. न्यायालयाने या याचिकेवर म्हात्रे यांना नोटीस जारी केली असून, प्रत्युत्तर दाखल करण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे.

समाजात स्पष्ट संदेश गेला पाहिजे

सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी रमेश म्हात्रे आणि त्यांच्या विचारसरणीवर तीव्र संताप व्यक्त केला. “डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना अमानुषपणे मारहाण करणे कसे समर्थनीय ठरू शकते? हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचाच नव्हे, तर सार्वजनिक सुरक्षेचाही अत्यंत गंभीर प्रश्न आहे,” असे मत न्यायालयाने नोंदवले.

उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे म्हात्रे यांना आधीच दोषी ठरवल्यासारखी स्थिती निर्माण झाली असून खटला जलद गतीने चालवण्यावर वकील रोहतगी यांनी आक्षेप घेतला. त्यावर न्यायमूर्तींनी स्पष्ट केले की, “खटल्याची सुनावणी वेगाने झाली तर त्यात गैर काय? अशा प्रकरणांमध्ये समाजात एक कडक संदेश जायलाच हवा.”

पालघरमधील हल्ल्याचीही दखल

डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली. सुनावणीदरम्यान खंडपीठाने नुकत्याच पालघरमध्ये एका डॉक्टरवर झालेल्या अशाच प्रकारच्या हल्ल्याचा उल्लेख केला. “कालच सोशल आणि प्रिंट मीडियामध्ये पालघरच्या घटनेचे वृत्त आले आहे. असे लोक वारंवार डॉक्टरांना लक्ष्य करत आहेत, हे खपवून घेतले जाणार नाही,” अशी भूमिका न्यायालयाने मांडली. या प्रकरणातील पुढील सुनावणी आता 28 सप्टेंबरला होणार असल्याने रमेश म्हात्रे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…

साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रश्नच नाही:गरज असल्यास महाराष्ट्राबाहेर जातो, नगरसेवक रमेश म्हात्रेंकडून कोर्टाला विनवणी

डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी आणि शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी विनंती केली. ‘आपण सध्या तुरुंगात असल्याने पीडित आणि साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तसेच पोलिसांचा तपासही बहुतांश पूर्ण झाला आहे. त्यामुळे आवश्यकता वाटल्यास चार-सहा आठवडे राज्याबाहेर राहण्याची अट घालून जामीन मंजूर करावा,’ असा युक्तिवाद त्यांनी केला. येथे वाचा संपूर्ण बातमी

कल्याण रुग्णालय प्रकरण:रमेश म्हात्रे म्हणाले, ‘महिला डॉक्टरला मारहाण नाही’, रुग्णाची आई म्हणाली, ‘बाहेर पूर आणि डॉक्टर म्हणाले सायनला न्या!’

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली होती. आता या वाढत्या दबावानंतर, ज्यांच्यावर मारहाणीचा आणि धक्काबुक्कीचा मुख्य आरोप आहे, ते सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मी त्या महिला डॉक्टरवर हात उचललेला नाही, ती माझ्या मुलीसारखी आहे. केवळ सीसीटीव्हीच्या कॅमेरा अँगलमुळे तसे दिसत आहे,” असा दावा करत म्हात्रे यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.