![]()
ज्यात सणासुदीचे दिवस सुरू असतानाच आता डीजे बंदी आणि हिंदू सणांवरील निर्बंधांवरून राजकारण तापले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेत थेट आव्हान दिले आहे. “डीजेचा त्रास जर सगळ्यांनाच होत असेल, तर आगामी ईदलाही डीजे बंद झाला पाहिजे. ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी ईदच्या आधी असे बोलून दाखवावे,” असे खुले आव्हान राणे यांनी दिले आहे. सल्ले फक्त हिंदू धर्मालाच का? हिंदू सणांवरून आणि संतांवरून केल्या जाणाऱ्या टिकेचा नितेश राणे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, “कितीतरी मौलवी महिलांबद्दल अपशब्द वापरतात. ‘तुम्ही जिहाद केला तर मेल्यानंतर ७२ हूर मिळतील’ असे उघडपणे सांगतात. हे लोक ७२ हूर मोजायला गेले होते का? असे प्रक्षोभक बोलणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची किंवा त्यांच्याविरोधात बोलण्याची हिंमत कुणीच का करत नाही? सगळे शहाणपणाचे सल्ले फक्त हिंदू धर्मालाच का दिले जातात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सनातन हिंदू धर्माला आणि संतांना जाणीवपूर्वक टार्गेट करून बदनाम करण्याचा कार्यक्रम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. गरब्यात मुस्लिमांना नो-एन्ट्री नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोलताना नितेश राणे यांनी गरबा आणि दांडियात मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, अशी भूमिका मांडली. “मुस्लिमांच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये जर इतरांना परवानगी नसते, तर दांडियाच्या कार्यक्रमातही मुस्लिमांना परवानगी नकोच. काही जिहादी प्रवृत्तीचे लोक आपली खोटी नावे सांगून गरब्याच्या कार्यक्रमात घुसखोरी करतात,” असा दावा त्यांनी केला. बाळासाहेबांच्या धाडसाची आठवण हिंदू धर्मावर टीका करणाऱ्यांना आव्हान देताना नितेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या धाडसाची आठवण करून दिली. “सगळेजण हिंदू धर्मालाच सल्ले देतात, त्यापेक्षा इस्लामबद्दल किंवा कुराणबद्दल बोलण्याची हिंमत दाखवा. जे थेट बोलण्याची हिंमत केवळ आमच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती,” असे नितेश राणे यावेळी म्हणाले. हेही वाचा.. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 11वा दिवस: मध्यरात्री प्रकृती खालावली, अडीच वाजता मंत्र्यांचा फोन; मराठा आंदोलक आक्रमक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 11वा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यानंतर मागण्यांबाबत आश्वासन मिळाले होते. मात्र, त्यानंतर ठोस कार्यवाही होत नसल्याने जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी पाणी आणि उपचार घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे आंदोलनस्थळी उपस्थित मराठा समाजबांधवांमध्ये त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली आहे. दरम्यान, काल रात्री मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आणखी खालावल्याची माहिती समोर आली. त्यांचे वजन कमी झाले असून शुगर आणि रक्तदाबही कमी झाल्याचे सांगण्यात आले. रात्री अडीच वाजता त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. यानंतर ही माहिती सरकारमधील मंत्र्यांना देण्यात आली. सविस्तर वाचा
Source link
'डीजेचा त्रास सगळ्यांनाच, मग ईदलाही डीजे बंद झाला पाहिजे':हिंदू सणांवरील निर्बंधांवरून नितेश राणेंचा घणाघात