Headlines

Rohit Pawar MPSC Corruption Statement; Protest In Pune & Sambhajinagar


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही विद्यार्थ्यांचा मोठा आक्रोश पाहायला मिळत आहे. आज शहरात निघालेल्या विद्यार्थ्यांच्या या विराट मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यां

.

अध्यक्ष आणि सचिवांना हटवा

रोहित पवार यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट करत सरकारकडे प्रमुख मागण्या केल्या आहेत. ते म्हणाले की, “सरकारने आतातरी MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांना पदावरून हटवावे. तसेच, पेपरफुटी प्रकरणात अटक झालेल्या आरोपींच्या कार्यकाळात ज्या-ज्या परीक्षा झाल्या, त्या सर्वांची सखोल चौकशी करावी.” एमपीएससीच्या परीक्षेत भ्रष्टाचाराची भेसळ करणाऱ्यांना खड्यासारखं बाजूला सारून, त्या जागी स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

भाजप आणि ट्रोलर्सवर निशाणा

राज्यात ठिकठिकाणी निघणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोर्चांचा संदर्भ देत रोहित पवार यांनी भाजपवर बोचरी टीका केली. “आता लिहून दिलेला मजकूर कॉपी करून ट्विट करणारे भाजपाचे नेते आणि ४० पैसे कमेंटवर पोट भरणारे बाजारू लोक, या सामान्य परिवारातील मुलांच्या आक्रोशालाही नौटंकी म्हणणार का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात पसरेल

सरकारला भविष्यातील परिणामांची जाणीव करून देताना पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांचा हा आक्रोश केवळ पुण्यापुरता मर्यादित राहणार नाही, हे मी कालच स्पष्ट केले होते आणि आज लगेचच ते संभाजीनगरमध्ये दिसले. सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास आजचा आक्रोश रोषात रूपांतरित होईल, जे सरकारला अजिबात परवडणार नाही. जर योग्य तोडगा काढला नाही, तर हा असंतोष राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात दिसल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

हेही वाचा..

200 आमदारांचे सरकार तरीही महाराष्ट्र अडचणीत: शेतकरी आणि एमपीएससीच्या मुद्द्यांवरून सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर सडकून टीका

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. एसटी महामंडळातील मनुष्यबळाचा प्रश्न, राज्यातील असमान पावसाची स्थिती, शेतकऱ्यांना हमीभाव न मिळणे, कर्जमाफी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी सरकारला धारेवर धरले. राज्यातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती गंभीर असून सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावून तातडीने आढावा घ्यावा, अशी मागणीही सुळे यांनी केली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.