Headlines

संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त लासलगावी पालखी:भक्तिमय साेहळ्यात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम; प्रवचनाला भाविकांची गर्दी‎



येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात सकाळी महाराजांच्या मूर्तीचे अभिषेकासह पूजन केले. त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी काढलेल्या पालखी सोहळ्याने मंदिर

.

विद्यानगर, सुमतीनगर व अमृतनगर परिसरातून संत सेना महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यानंतर मंदिर परिसरात विक्रम महाराज काळे रेडगावकर यांचे प्रवचन झाले. संत सेना महाराजांचे विचार व भक्तिपरंपरेचे महत्त्व त्यांनी सांगितले. प्रवचनालाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दुपारी महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी लासलगाव शहरासह परिसरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. शहरातील राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिकांसह भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतले. या धार्मिक सोहळ्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय व उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमाचे आयोजन श्री संत सेना चॅरिटेबल ट्रस्ट व समस्त नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *