![]()
डोळ्यांसमोर रौद्ररूप धारण केलेला महापूर… क्षणाक्षणाला वाढणारे पाण्याचे लोट… आणि जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणाचा घेतलेला आसरा! नेपाळमधील महापुरातून बचावल्याचा हा थरारक अनुभव संगमनेर साहित्यिक मंडळाचे सदस्य हिरालाल पगडाल यांनी बालगृहातील विद्यार्थ्यांसमोर मांडला आणि विद्यार्थ्यांना जणू नेपाळच्या त्या भयावह प्रसंगाचा प्रत्यक्ष अनुभवच आला. संगमनेर साहित्यिक मंडळाच्या वतीने बालगृहात आयोजित ‘वाचन मंडळा’च्या बैठकीत पगडाल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुलांना समजेल अशा सहज, ओघवत्या भाषेत त्यांनी नेपाळमधील महापुराचे रौद्ररूप, उंच ठिकाणावरून दिसणारे पाण्याचे प्रचंड लोट आणि संकटातून बचावण्याचे क्षण सांगितले. त्यांच्या अनुभवकथनामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल आणि थरार दोन्ही स्पष्ट दिसत होते. महापुराच्या थरारानंतर पगडाल यांनी विद्यार्थ्यांना नेपाळची दुसरी बाजूही उलगडून दाखवली. नेपाळचे भौगोलिक स्थान, प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रे, बाजारपेठा, मंदिरे, खाद्यसंस्कृती आणि तेथील जीवनशैली याबाबत त्यांनी माहिती दिली. अचानक मुक्काम करावा लागल्यास मोठे खोलीभाडे द्यावे लागू शकते, या अनुभवाने विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेत आणखी भर पडली. संगमनेर साहित्यिक मंडळातर्फे दर रविवारी ‘वाचन मंडळ’ उपक्रम राबविला जातो. कथा, प्रवासवर्णने व पुस्तकांच्या माध्यमातून नव्या पिढीत वाचनाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. बालगृहात बैठक घेण्याचा पुढाकार प्रकल्प प्रमुख पुष्पाताई निऱ्हाळी यांनी घेतला. उपक्रमासाठी रामनाथ सातपुते व ज्ञानेश्वर राक्षे यांनी विशेष परिश्रम घेतले. अध्यक्ष अरविंद गाडेकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, बालगृहाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नेपाळच्या बाजारपेठेत भेटली चक्क मराठी माणसे! महापुराच्या थरारानंतर हिरालाल पगडाल यांनी विद्यार्थ्यांना नेपाळच्या सुंदर प्रवासाची आणि संस्कृतीची उजळ बाजू उलगडून दाखवली. नेपाळचे भौगोलिक स्थान, आवश्यक कागदपत्रे, तिथली मंदिरे, खाद्यसंस्कृती आणि जीवनशैलीवर त्यांनी प्रकाश टाकला. विशेष म्हणजे, नेपाळच्या बाजारपेठेत अचानक मराठी भाषेत बोलणारी माणसे भेटल्याचा रंजक किस्सा ऐकून आणि तिथे अचानक मुक्काम करावा लागल्यास द्यावे लागणाऱ्या मोठ्या खोलीभाड्याची माहिती ऐकून बालगृहातील मुलांच्या उत्सुकतेला आणि आश्चर्याला पारावार उरला नाही. यानंतर विविध खेळ, गप्पा आणि खाऊच्या पार्टीने या संवादात्मक बैठकीत आनंदाचे चैतन्यमय वातावरण
Source link
समोर होता महापूर… आणि जीव वाचवण्यासाठी घ्यावी लागली धाव:नेपाळमधील अनुभव पगडाल यांनी बालगृहातील विद्यार्थ्यांसमोर मांडला