Headlines

आझाद हिंद मंडळात खाटू श्याम बाबा मंदिराचा देखावा:गणेशोत्सवासाठी उभारणी, 15 सप्टेंबरला खुला होणार; मंडळ 99 व्या वर्षात पदार्पण




अमरावती येथील ऐतिहासिक आझाद हिंद मंडळाने यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी खाटू नरेश ‘श्री श्याम बाबा मंदिरा’चा देखावा तयार केला आहे. हे मंडळ आता 99 व्या वर्षात पदार्पण करत आहे. हा देखावा गणेश स्थापनेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 15 सप्टेंबरला नागरिकांसाठी खुला केला जाईल. मुंबईचे प्रसिद्ध कलाकार अनिल वाट आणि त्यांचे सहकारी या भव्य मंदिराची उभारणी करत आहेत. आझाद हिंद मंडळ त्यांच्या आकर्षक देखाव्यांसाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी ओळखले जाते. यावर्षी ‘हारे का सहारा – खाटू श्याम हमारा’ या नावाने भगवान खाटू नरेशचे दर्शन घडणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या मंडळाने सामाजिक सलोखा जपण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. मंडळाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष किशोर फुले यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली, तर नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी आभार मानले. जुन्या अमरावती शहरातील प्रसिद्ध गणेशोत्सवांपैकी एक असलेल्या आझाद हिंद मंडळाची आगमन शोभायात्राही भव्य असते. ही शोभायात्रा यावर्षी 14 सप्टेंबरला दुपारी 2 वाजता मंडळातून निघेल. यात शंभर मुलींचे टिपरी नृत्य, शंभर महिलांचे पायदळ भजन, शंभर स्वयंसेवकांचे लेझीम पथक, विविध ढोल पथक आणि दिंड्या यांचा समावेश असेल. आगमन मिरवणुकीदरम्यान राजकमल चौकात महाआरतीही केली जाईल. भगवान खाटू श्याम यांची भजने गाणारे राजस्थानचे गायक छोटूसिंह रावणा हे देखील अमरावतीत येणार आहेत. 19 सप्टेंबरला सायंकाळी 7 वाजता त्यांची भजन मैफल सुरू होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुळकर्णी (नागपूर) यांची ‘प्रेमाचे काव्य’ ही मैफल होईल. 21 सप्टेंबरला ‘तरुण आहे रात्र अजूनी’ हा हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या मंडळाने अनेक उत्कृष्ट मल्ल, प्रसिद्ध नाट्यकर्मी आणि राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू घडवले आहेत. समाजकारण आणि राजकारणातही मंडळाचे मोठे योगदान आहे. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत गुढे तीन वेळा खासदार झाले, तर विलास इंगोले यांनी दीर्घकाळ महापौरपद भूषवले. दिवंगत सोमेश्वर पुसतकर यांनी इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये विशेष प्राविण्य मिळवले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *