Headlines

शेवगावकर नागरिकांनी अनुभवला दहिहंडीचा थरार:वडार समाज गोविंदा पथकाने पटकावले प्रथम पारितोषिक, नागरिकांनी केली मोठी गर्दी‎




शहरातील खंडोबा मैदानावर आयोजित ‘नगराध्यक्ष भव्य दहीहंडी उत्सव सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास शिवसेना नेते अरुण मुंढे, नगराध्यक्षा माया मुंढे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. ज्येष्ठ नेते अरुण लांडे, पैठण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भूषण कावसानकर, दूध महासंघाचे चेअरमन नंदू काळे, व्हाईस चेअरमन नंदू पठाडे, पंचायत समिती सदस्य डॉ. भारत झारगड, प्रगतशील शेतकरी निवृत्ती मापारी, गहिनीनाथ शिरसाठ, संजय कीर्तने, अर्जुन धायतडक, कृष्णा धायतडक, ॲड. भाऊसाहेब सानप, अमोल सागडे, प्रेम जाजू, राजू तरटे, नगरसेवक नंदकुमार मुंढे, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, एकनाथ कुसळकर, ॲड. शाम कनगरे, उदय गांगुर्डे उपस्थित होते. दहीहंडी फोडण्याच्या चुरशीच्या स्पर्धेत वडार समाज गोविंदा पथकाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या पथकास १ लाख ११ हजार १११ रोख पारितोषिक व मानाची ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यात विविध गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सहभागी पथकांपैकी पाच पथकांना प्रत्येकी ११००० रुपये उत्तेजनार्थ पारितोषिक व ट्रॉफी देण्यात आली. दरम्यान, कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या ‘धप्पा’ चित्रपटातील कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करून कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच नृत्यांगना स्नेहा पिंपरीकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. दहीहंडी सोहळ्यास शहरातील मान्यवर, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घेतला. उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आयोजकांच्यावतीने सर्वांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन अरुण मुंढे मित्र मंडळ, वंदे मातरम् ग्रुप व दहीहंडी उत्सव समिती, शेवगाव शहर यांच्यावतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक कुसळकर यांनी केले. शेवगावच्या उत्साहाची, एकजुटीची आणि सांस्कृतिक परंपरेची झलक या दहीहंडी सोहळ्यात अनुभवायला मिळाली. शहर व तालुक्यात दहिहंडीचा थरार दरम्यान, शहर आणि तालुक्यात ठिकठिकाणी दहिहंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. गोविंदा पथकांनी दहिहंडी फोडली. दहिहंडीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. गोविंदा रे गोपाळाचा गजर सर्वत्र सुरू होता. या सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या प्राचीन संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला. या उत्सवाच्या माध्यमातून समाजात एकता अधिक दृढ करण्याचाही संदेश देण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *