![]()
पाटबंधारे विभागाच्या ग्रा.पं.तींना सूचना
एल निनोच्या सक्रियतेमुळे यंदा पर्जन्यमान अत्यल्प झाले असून, सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातील पाणीपातळी वेगाने खालावत आहे. आगामी काळात निर्माण होणारी संभाव्य भीषण पाणीटंचाई लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांच्य
.
काटेपूर्णा धरणात सध्या केवळ ३४१.४० मीटर (२०.५२० दशलक्ष घनमीटर) म्हणजेच अवघा २३.७६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. पाण्याची ही बिकट परिस्थिती पाहता, महान धरण जलाशय क्षेत्र तसेच महान धरण ते उन्नई खांभोरा दरम्यान नदीकाठच्या परवानाधारक शेतकऱ्यांनी आपले सिंचनाचे मोटारपंप तत्काळ बंद ठेवावेत, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. आदेशाचे उल्लंघन करून मोटारपंप सुरू ठेवल्यास ते जप्त करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
ग्रामपंचायतींमार्फत दवंडी शेतकऱ्यांनी जलाशय व नदीपात्रातून पाण्याचा उपसा करू नये, यासाठी पाटबंधारे विभागाने संबंधित परिसरातील ग्रामपंचायतींना पत्र पाठवले आहे. गावांमध्ये दवंडी देऊन शेतकऱ्यांना माहिती देण्यात येत आहे. पिण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे पाणी बचतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
महान प्रकल्पाच्या पाण्यावर रब्बी हंगामात ६०६ हेक्टर क्षेत्रावर सिंचन केले जाते. काटेपूर्णा जलाशयातून १९० हेक्टर, तर महान धरण ते उन्नई खांभोरा बंधाऱ्यादरम्यान ४१६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी पाटबंधारे विभागाने या सर्व ६०६ हेक्टर क्षेत्रावरील उपशाच्या परवानग्या रद्द केल्या.