Headlines

खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंची मोठी मोर्चेबांधणी:राज्यातील 40 लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची यादी जाहीर




पक्ष आणि चिन्हाचा वाद न्यायालयात सुरू असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेत राज्यातील 48 पैकी 40 लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नवी यादी जाहीर केली आहे. मुंबईतील 6 मतदारसंघ, ठाणे आणि जळगाव वगळता इतर सर्व 40 मतदारसंघांत जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. पक्षातील 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे गटाने मुंबईतील तरुण नेते, आमदार आणि माजी नगरसेवकांवर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. प्रमुख नेते आणि जबाबदाऱ्या विभागीय संपर्कप्रमुखांची संपूर्ण यादी पश्चिम महाराष्ट्र: उत्तर महाराष्ट्र व कोकण: मराठवाडा: विदर्भ: ‘फुटलेल्या मनोवृत्तीचे लोक काय कारभार करणार?’ उद्धव ठाकरेंचा घणाघात संघटनात्मक फेरबदलांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एमपीएससी आणि नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराच्या या कारभारात नेमका राजीनामा कोणाचा घ्यायचा? या फोडाफोडीच्या राजकारणात आमदार फुटले की सुरत-गुवाहाटीला पळतात. जे स्वतः फुटले आहेत, अशा विकृत आणि फुटलेल्या मनोवृत्तीचे लोक काय कारभार करणार?” असा संतप्त सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. ————- हेही वाचा… अमृता फडणवीस म्हणाल्या- जरांगे माझे भाऊ, त्यांनी घरी जेवायला यावे: मराठा आंदोलनादरम्यान दिले निमंत्रण; गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशाचे केले होते समर्थन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना आपला भाऊ म्हटले आहे. बुधवारी रात्री नागपूरमधील एका कार्यक्रमानंतर त्या म्हणाल्या- जरांगेजी माझे भाऊ आहेत. ते माझ्या घरी जेवायला यावेत अशी माझी इच्छा आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *